मराठी बातम्या /बातम्या /विदेश /13 वर्षांचा मुलगा 66 दिवस घरात एकटाच राहिला आणि चमत्कार घडला, घडलं असं काही...

13 वर्षांचा मुलगा 66 दिवस घरात एकटाच राहिला आणि चमत्कार घडला, घडलं असं काही...

13 वर्षांचा मुलगा 2 महिने घरात एकटाच अडकला होता आणि इतके दिवस अन्न बनवण्यापासून ते स्वतःची आणि आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याची अक्कलही त्याला आली.

13 वर्षांचा मुलगा 2 महिने घरात एकटाच अडकला होता आणि इतके दिवस अन्न बनवण्यापासून ते स्वतःची आणि आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याची अक्कलही त्याला आली.

13 वर्षांचा मुलगा 2 महिने घरात एकटाच अडकला होता आणि इतके दिवस अन्न बनवण्यापासून ते स्वतःची आणि आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेण्याची अक्कलही त्याला आली.

नवी दिल्ली, 12 मे : तुम्ही ऐकले असेल की, जेव्हा एखाद्या माणसाच्या डोक्यावर अचानक संकट येतात तेव्हा तो सर्व काही शिकतो. असाच काहीसा प्रकार चीनमध्ये राहणाऱ्या एका 13 वर्षांच्या मुलासोबत घडला. एकेकाळी खूप आळशी असलेला आणि कधी स्वत:चीही कामे नीट न करणारा मुलगा (Boy Learns to Cook and Look After Pets) 66 दिवस घरात एकटाच राहिला आणि त्याने फक्त स्वतःचीच नाही तर पाळीव प्राण्यांचीही चांगली काळजी घेतली. घर व्यवस्थित ठेवलं, सर्व गोष्टींची चांगली काळजी घेतली.

चीनचा (China News) हा मुलगा त्याच्या आई-वडिलांसोबत राहतो. सध्या आपल्या देशात कोरोना व्हायरसची परिस्थिती नियंत्रणात असली तरी चीनमध्ये मात्र परिस्थिती वेगळी (Corona Virus News) आहे. तिथे कोरोनाच्या कहरामुळे काही भागात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली होती. मुलाचे आई-वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते, तेव्हाच लॉकडाऊन झाला आणि हा मुलगा घरात एकटाच अडकला. त्याला फक्त स्वतःचीच नाही तर घरात पाळलेल्या कुत्र्या-मांजराचीही काळजी घ्यावी लागली.

हे वाचा - 'झोपाळू' गावामुळे संशोधकही अचंबित; येथे चालता-चालता झोपतात लोक; कारण...

कुत्रा आणि मांजरासोबत 66 दिवस एकटा राहिला

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, मुलाचे नाव कुंशान असून तो जिआंगशु प्रांतात राहतो. वडिलांच्या वैद्यकीय उपचारांमुळे त्याचे आई-वडील 28 फेब्रुवारीला शांघायला गेले. दरम्यान, चीनमधील लॉकडाऊनमुळे ते एप्रिलपर्यंत शांघायमध्ये अडकले होते. या दोन महिन्यांत त्यांचा 13 वर्षांचा मुलगा घरीच होता. त्याचे ऑनलाइन क्लासेसही सुरू होते आणि तो संपूर्ण घरही एकट्यानेच सांभाळत होता. त्याच्यासोबत घरात एक पाळीव कुत्रा आणि मांजरही होते. मुलाच्या आईने काही आठवड्यांसाठी आपल्या मुलासाठी आणि पाळीव प्राण्यांसाठी ऑनलाइन अन्न पाठवलं. परंतु खरी अडचण तेव्हा आली, जेव्हा ही सेवा देखील बंद करण्यात आली.

हे वाचा - दानिश सिद्दीकींना मरणोत्तर पुलित्झर पुरस्कार; फोटोंतून मांडली होती कोरोना स्थिती

मुलगा स्वयंपाक करायला आणि पाळीव प्राणी सांभाळायलाही शिकला

66 दिवस मुलगा घरी एकटाच असल्याच्या विचारानं त्याची आई प्रचंड घाबरली होती, पण मुलाने स्वतःच तिचं सांत्वन केलं आणि काळजी करू नका, असं सांगितलं. फोनवरच आईकडून स्वयंपाक शिकला. घरात ठेवलेल्या स्वयंपाकाच्या साहित्याच्या मदतीने मुलाने प्री-प्रिपेयर्ड मील तयार केलं. पण त्याचा कंटाळा आल्यावर मूल योग्य प्रकारे स्वयंपाक करायला शिकला. इतके दिवस घर खूप अस्वच्छ झालं असलं तरी तो आपल्या कुत्र्या-मांजरासाठी भांडी साफ करत असे. आईने आश्चर्य व्यक्त केले की, जेव्हा ती परत आली तेव्हा मुलगा आणि दोन्ही पाळीव प्राण्यांची प्रकृती चांगली होती.

First published:
top videos

    Tags: Corona, Lockdown