राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार आणि अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले आहे. अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. माजी मंत्री आणि अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष राहिलेले कर्डिले यांनी नगर-नेवासा आण...