सोलापूर, 18 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर मतदारसंघात गुरुवारी मतदान पार पडलं. ''निवडणुकीदरम्यान कोणतंही बटन दाबलं तरी मत भाजपलाच जातं'' अशी तक्रार काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी केली. तसंच ''अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये गोंधळ झाल्याच्या तक्रारीसुद्धा माझ्याकडे आल्या आहेत'' असंही ते यावेळी म्हणाले.