राज्यात पावसाने धुमशान घातले आहे. पश्चिम महाराष्ट्रापासून ते गडचिरोलीपर्यंत पावसाने कहर केला आहे. सततच्या संततधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत असल्याने आणि मैदानी भागात मोठ्या प्रमाणात पूर आल्याने, लोकांना सखल भागातून सुरक्षितस्थळी हलवले जात आहे.