मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

YouTube मधून मिळेल घसघशीत कमाईची संधी, तुम्हाला करावं लागेल हे काम

YouTube मधून मिळेल घसघशीत कमाईची संधी, तुम्हाला करावं लागेल हे काम

या फीचरद्वारे युजर्स आपल्या आवडीच्या यूट्यूब चॅनलला काही आवश्यक टीप्स देऊ शकतील. तसंच या फीचरमुळे कंटेट क्रिएटर्सला पैसे कमावण्यासाठी मदत मिळेल.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 22 जुलै: यूट्यूबने (YouTube) आपल्या सर्व कंटेंट क्रिएटर्ससाठी आपल्या व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवर एक नवं फीचर लाँच केलं आहे. सुपर थँक्स (Super Thanks) असं या नव्या फीचरचं नाव आहे. तसंच या फीचरद्वारे युजर्स आपल्या आवडीच्या यूट्यूब चॅनलला काही आवश्यक टीप्स देऊ शकतील. या फीचरमुळे कंटेट क्रिएटर्सला पैसे कमावण्यासाठी मदत मिळेल. या फीचरमुळे यूट्यूब फेसबुक आणि इन्स्टाग्रामला टक्कर देऊ शकेल. तुम्हीही कंटेट क्रिएटर बनलात तर या नव्या फीचरद्वारे चांगली कमाई करता येऊ शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, यूट्यूब व्हिडीओ पाहणारे युजर्स आता आभार व्यक्त करण्यासाठी तसंच आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला समर्थन देण्यासाठी सुपर थँक्स खरेदी करू शकतात. यूट्यूबच्या सुपर थँक्स फीचर अंतर्गत युजर्स आपल्या आवडीच्या यूट्यूब चॅनलला 2 डॉलर ते 50 डॉलरपर्यंत देऊ शकतात.

(वाचा - Google Search मधून दिसली अनेकांची भीती, कोरोना संकटकाळात या गोष्टी सर्वाधिक सर्च)

युजर्स सुपर थँक्स खरेदी करू शकतात. ज्यावेळी युजर आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला पेमेंट करतो, त्यावेळी त्या चॅनलला देण्यात आलेली टीप कमेंट सेक्शनमध्येही हायलाईट होईल. यामुळे कंटेंट क्रिएटर्सला समजेल की कोणी आणि किती पैसे दिले आहेत.

(वाचा - Instagram Security फीचर असं करा अ‍ॅक्टिव्हेट, तुमचं अकाउंट हॅकर्सपासून राहिल सेफ)

सुपर थँक्स फीचर सध्या 68 देशांमध्ये आहे. हे फीचर डेस्कटॉप आणि मोबाईल डिव्हाईसवर उपलब्ध आहे. तसंच अँड्रॉईड आणि आयओएस दोन्हीवरही देण्यात आलं आहे. या फीचरमुळे कंटेंट क्रिएटर्स अधिकाधिक युजर्सपर्यंत जोडू शकतील. तसंच त्यांना अधिक कमाईचीही संधी मिळेल.

First published:

Tags: Youtube, YouTube Channel, Youtubers