मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Google Search मधून दिसली अनेकांची भीती, कोरोनाच्या संकटकाळात या गोष्टींचं सर्वाधिक सर्च

Google Search मधून दिसली अनेकांची भीती, कोरोनाच्या संकटकाळात या गोष्टींचं सर्वाधिक सर्च

एका अहवालानुसार, महामारीच्या काळात इंटरनेटवर आरोग्य, गुंतवणूक, मनोरंजन आणि ऑनलाईन शिक्षण याबाबत सर्वाधिक सर्च केलं गेलं.

एका अहवालानुसार, महामारीच्या काळात इंटरनेटवर आरोग्य, गुंतवणूक, मनोरंजन आणि ऑनलाईन शिक्षण याबाबत सर्वाधिक सर्च केलं गेलं.

एका अहवालानुसार, महामारीच्या काळात इंटरनेटवर आरोग्य, गुंतवणूक, मनोरंजन आणि ऑनलाईन शिक्षण याबाबत सर्वाधिक सर्च केलं गेलं.

  नवी दिल्ली, 21 जुलै: कोरोना महामारीमुळे लोकांच्या दैनंदिन जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. अशा प्रकारच्या महामारीचा सामना यापूर्वी कधीच न केल्यामुळे, अशा परिस्थितीत काय करायचं हेच कोणाला माहिती नव्हतं. त्यातच लॉकडाउनमुळे घरी राहावं लागलं, सगळी कामं ऑनलाईन (Online) करावी लागणं आणि हे करत असतानाच विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून घ्यावी लागणारी काळजी, याची भीती या सगळ्यामुळे आपल्या नेहमीच्या सवयी बदलल्या आहेत.

  या महामारीमुळे लोक आपल्या आरोग्याकडे विशेषतः इम्युनिटी, म्हणजेच रोगप्रतिकार शक्तीकडे (Immunity) विशेष लक्ष देऊ लागले आहेत. यासोबतच लोक आर्थिक गुंतवणुकीबाबतही जास्त विचार करू लागले आहेत. एका अहवालानुसार, महामारीच्या काळात इंटरनेटवर आरोग्य, गुंतवणूक, मनोरंजन आणि ऑनलाईन शिक्षण याबाबत सर्वाधिक सर्च केलं गेलं.

  इनमोबी (Inmobi) या वेबसाईटने ‘इंडिया 2021 ट्रेंड्स रिपोर्ट’ (India-2021 Trends Report) नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये कोरोना महामारीनंतर नेटिझन्सच्या ‘सर्च प्रेफरन्स’मध्ये (India Search Preference) आलेला बदल दाखवण्यात आला आहे. एप्रिल 2020 ते जून 2021 या दरम्यान भारतीयांनी इंटरनेटवर ज्या गोष्टी सर्च केल्या, त्या माहितीवरुन हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार, गेल्या वर्षभरात इम्युनिटी आणि एकूणच आरोग्यसंबंधी गोष्टी (Health related search) सर्च करण्यात 125 टक्के वाढ दिसून आली. यासोबतच घरात करता येणारे व्यायाम प्रकार, ऑनलाईन डान्स क्लास या गोष्टीही मोठ्या प्रमाणात सर्च केल्या गेल्या.

  आरोग्यासोबतच, लोक ऑनलाईन शिक्षणाबाबत (Online Education) अधिक जागरुक झाले. ऑनलाईन शिक्षणाबाबत आधीच्या तुलनेत गेल्या वर्षभरात तब्बल 367 टक्के जास्त सर्च करण्यात आलं. तर, ऑनलाईन प्रशिक्षणाबाबत 103 टक्के अधिक सर्च करण्यात आलं. ‘डिजिटल पेमेंट’बाबतच्या (Digital Payments) शोधांमध्ये 12 टक्के वाढ दिसून आली. तर, अॅसेट मॅनेजमेंटबद्दल 13 टक्के अधिक सर्च करण्यात आल्याचं दिसून आलं.

  (वाचा - Google Search Trends: फ्री पॉर्नपेक्षा या गोष्टीत भारतीयांना अधिक रस; अहवालात हैराण करणारी बाब समोर)

  यासोबतच, ऑनलाईन डिलिव्हरी सेवांसंबंधी पूर्वीच्या तुलनेत 15 टक्के अधिक सर्च करण्यात आलं. कारण, महामारीमुळे लोक घरीच बसून होते. मनोरंजनासाठी सिनेमागृह किंवा नाट्यगृह बंद असल्यामुळे लोकांनी ओटीटीचा पर्याय निवडला. या काळात ‘मोस्ट पॉप्युलर नेटफ्लिक्स सीरीज (Most Popular Netflix Series) हे 28 टक्के अधिक सर्च केलं गेलं. तर, ‘क्रिकेट लाईव्ह स्कोर’ याबाबत 381 टक्के अधिक सर्च केलं गेलं. ऑनलाईन गेम्सच्या शोधामध्येही आधीच्या तुलनेत 52 टक्के वाढ झाली.

  Inmobi मधील मायक्रोसॉफ्ट ॲडव्हर्टायझिंग डिरेक्टर रोहित दोसी यांनी सांगितलं, की गेल्या काही महिन्यांमध्ये लोक जास्तीत जास्त वेळ ऑनलाईन राहू लागले आहेत. काम, शिक्षण किंवा मनोरंजन या सगळ्या गोष्टींसाठी लोक इंटरनेटवर येत आहेत. त्यामुळे सर्च ॲडव्हर्टायझिंग किंवा ऑनलाईन जाहिरातींसाठी ही एक चांगली संधी असणार आहे.

  First published:
  top videos

   Tags: Google, Tech news, Technology