मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Instagram Security फीचर असं करा अ‍ॅक्टिव्हेट, तुमचं अकाउंट हॅकर्सपासून राहिल सुरक्षित

Instagram Security फीचर असं करा अ‍ॅक्टिव्हेट, तुमचं अकाउंट हॅकर्सपासून राहिल सुरक्षित

एखाद्या युजरचं अकाउंट आधीच हॅक झालं असेल किंवा त्याच्या अकाउंटचा डेटा लीक झाला असल्यास, याबाबत युजरला माहिती मिळेल.

एखाद्या युजरचं अकाउंट आधीच हॅक झालं असेल किंवा त्याच्या अकाउंटचा डेटा लीक झाला असल्यास, याबाबत युजरला माहिती मिळेल.

एखाद्या युजरचं अकाउंट आधीच हॅक झालं असेल किंवा त्याच्या अकाउंटचा डेटा लीक झाला असल्यास, याबाबत युजरला माहिती मिळेल.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 21 जुलै: इन्स्टाग्राममध्ये (Instagram) एक नवं अपडेट आलं आहे. हे अपडेट युजर्सला अकाउंट सुरक्षित-सेफ ठेवण्यासाठीच्या (Account Security) पद्धती सांगेल, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. एखाद्या युजरचं अकाउंट आधीच हॅक झालं असेल किंवा त्याच्या अकाउंटचा डेटा लीक झाला असल्यास, याबाबत युजरला माहिती मिळेल.

लॉगइन आधीच युजरला सिक्योरिटी चेकअप नोटिफिकेशन मिळेल. तुमचं अकाउंट हॅक झालं की, नाही हे तपासण्यासाठी सर्वात आधी आपलं इन्स्टाग्राम अकाउंट अ‍ॅपद्वारे लॉगइन करा. त्यानंतर सेटिंग्समध्ये लॉगइन अ‍ॅक्टिव्हिटी (Login Activity) चेक करा. यात त्या सर्व डिव्हाईसची लिस्ट दिसेल, ज्यात तुमचं अकाउंट नुकतंच लॉगइन केलं गेलं आहे.

अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी काय कराल?

- टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन

मोबाईल नंबरद्वारे इन्स्टाग्राम अकाउंटमध्ये टू-फॅक्टर (Two-Factor Authentication) ऑथेंटिकेशन ऑन करा. यासाठी गुगल ऑथेंटिकेशनचाही वापर करू शकता.

- ईमेल, फोन नंबर अपडेट

अकाउंटसह ईमेल आणि फोन नंबर नेहमी अप-टू-डेट ठेवणं गरजेचं आहे. ईमेल किंवा फोन नंबर बदलला तर तो लगेचच अपडेट करा.

(वाचा - स्मार्टफोन हरवला? PhonePay, Google Pay, Paytm कसं कराल सुरक्षित, पाहा प्रोसेस)

- मेसेज

मागील काही महिन्यांपासून अशी काही प्रकरणं समोर आली आहेत, ज्यात इन्स्टाग्रामच्या अकाउंटमधून लोकांना डायरेक्ट मेसेज (DM) पाठवण्यात आले. हे मेसेज खरंच इन्स्टाग्रामने पाठवले असल्याचा अनेक युजर्सचा समज झाला. परंतु ते पूर्णपणे फेक मेसेजेस होते. इन्स्टाग्राम कधीही आपल्या युजर्सला मेसेज पाठवत नाही.

(वाचा - Online Railway Ticket बुक करताना येतेय समस्या? घरबसल्या काही सेकंदात करा बुकिंग)

- लॉगइन रिक्वेस्ट

लॉगइन रिक्वेस्ट ऑन असल्यास, युजरला प्रत्येक लॉगइनवेळी एक नोटिफिकेशन मिळेल, ज्याप्रमाणे जीमेल आणि फेसबुकवर मिळतं. हा टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा भाग आहे. यामुळे ज्यावेळी कोणत्याही डिव्हाईसवर तुमचं अकाउंट लॉगइन होईल, त्यावेळी नोटिफिकेशन मिळेल.

First published:

Tags: Instagram, Instagram post, Tech news