मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

WhatsApp द्वारे खाली होऊ शकतं बँक अकाउंट, या गोष्टी लक्षात ठेवाच

WhatsApp द्वारे खाली होऊ शकतं बँक अकाउंट, या गोष्टी लक्षात ठेवाच

स्मार्टफोन, इंटरनेटद्वारे व्यवहार करताना सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे. WhatsApp द्वारेही फ्रॉड झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं फायद्याचं ठरतं.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 4 डिसेंबर : स्मार्टफोनचा वापर करणारे अनेक जण बँकेसंबंधी कामं करताना इंटरनेट आणि स्मार्टफोनची मदत घेतात. स्मार्टफोनवरुन बँकेसंबंधी काम करणं सुविधाजनक असलं, तरी याचाच फायदा सायबर क्रिमिनल्सकडून घेतला जातो. कोरोना काळात ऑनलाइन फ्रॉडमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे स्मार्टफोन, इंटरनेटद्वारे व्यवहार करताना सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे. WhatsApp द्वारेही फ्रॉड झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं फायद्याचं ठरतं.

डॉक्टर थेट WhatsApp वर उपलब्ध; फक्त ‘Hi’ पाठवा अन् विनामूल्य तज्ज्ञांचा सल्ला

या गोष्टी लक्षात ठेवाच -

- WhatsApp द्वारे तुमची खासगी माहिती बँक अकाउंट डिटेल्स, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा पीन नंबर, इंटरनेट बँकिंग पासवर्ड पाठवू नका.

- WhatsApp वर एखाद्या अनोळखी व्यक्ती किंवा अनोळखी नंबरद्वारे पाठवलेल्या फाइल डाउनलोड करू नका.

- तुमचा फोन हरवल्यास त्यातील WhatsApp लगेच डिअॅक्टिवेट करा.

- WhatsApp वर तुमचा OTP मागितल्यास, त्याला उत्तर देऊ नका.

WhatsApp ने एका महिन्यात बंद केले 20 लाखांहून अधिक अकाउंट, पाहा काय आहे कारण

- तुमचा फोन एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला विकताना त्यातील WhatsApp आणि इतर सर्व डेटा कायमसाठी डिलीट करा आणि फॅक्टरी सेटिंग रिस्टोर करा.

- WhatsApp वर आलेल्या कोणत्याही अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका, ज्यात WhatsApp तुमच्या पीसीसह कनेक्ट करण्याचा आणि डेस्कटॉपवरुन मेसेज पाठवू शकत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

- WhatsApp वर ऑटोमॅटिक डाउनलोड ऑप्शन डिसेबल करा.

- तुमचा फोन एखाद्या ओपन Wifi नेटवर्कशी कनेक्टेड असल्यास, WhatsApp चा वापर करू नका.

First published:

Tags: Tech news, Whatsapp alert, Whatsapp News, WhatsApp user