नवी दिल्ली, 4 डिसेंबर : सोशल मीडियावर फेक न्यूज आणि अशांतता पसरवणाऱ्यांविरोधात सोशल मीडिया App अलर्ट आहे. याविरोधात सतत कठोर पावलं उचलली जात आहेत. यादरम्यान WhatsApp ने ऑक्टोबर महिन्यात 20 लाखांहून अधिक अकाउंट बंद केले आहेत.
WhatsApp ने नव्या आयटी नियमांचं (New IT Rules) पालन करण्यास सुरुवात केली आहे. या नियमांतर्गत WhatsApp ला सब्सक्रायबर्सकडून 500 तक्रारी (compliance) मिळाल्या आहेत.
भारतीय युजर्सच्या खात्यांची ओळख +91 फोन नंबरद्वारे केली जाते. End-to-end encryption पॉलिसीमुळे युजर्सचे मेसेज पाहता येत नाहीत. अशात युजर्सची सुरक्षा लक्षात घेता अकाउंट्सकडून मिळणारे संकेत, एन्क्रिप्शनशिवाय काम करणारे फीचर्स आणि युजर्सकडून करण्यात आलेले रिपोर्ट्स या आधारावर निर्णय घेतला जातो. नव्या आयटी नियमांनुसार, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला दर महिन्याला कंप्लायन्स रिपोर्ट द्यावा लागतो.
WhatsApp ने एका रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात WhatsApp वर 2,069,000 भारतीय अकाउंटवर बंदी घालण्यात आली.
आर्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये (AI) गुंतवणूक -
रिपोर्टनुसार, WhatsApp एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड मेसेजिंग सर्विसेज (end-to-end encrypted messaging services) दरम्यान दुरुपयोग रोखण्यासाठी सर्वात पुढे आहे. कंपनीने सतत आर्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये गुंतवणूक केली आहे. तसंच कंपनीने इतर आर्ट टेक्नोलॉजी, डेटा सायंटिस्ट्स आणि एक्सपर्ट्समध्ये गुंतवणूक केली आहे. आपल्या युजर्सला सुरक्षा पुरवणं हाच कंपनीचा उद्देश आहे.
आयटी नियमांचं (IT Rules 2021) पालन करत ऑक्टोबर महिन्यातील हा पाचवा रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. या रिपोर्टमध्ये तक्रारी आणि संबंधित कारकाईचे डिटेल्स सामिल आहेत. चुकीच्या व्यवहारांसाठी WhatsApp ने आपल्या प्लॅटफॉर्मवर दर महिन्याला जवळपास 80 लाखहून अधिक अकाउंटवर बॅन लावला आहे. भारतात 20 लाखहून अधिक अकाउंट बॅन करण्यात आले आहेत.
या गोष्टी करू नका -
कोणी बेकायदेशीर, अश्लील, बदनामी करणारे, धमकी देणारे, त्रास देणारे, द्वेषपूर्ण भाषणं, वांशिक भेदभाव शेअर करत असेल, किंवा कोणत्याही बेकायदेशीर, अनुचित प्रथेला प्रोत्साहन देत असेल तर असे अकाउंट्स बॅन करण्यात येतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news, Whatsapp alert, WhatsApp features, Whatsapp News