मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Zomato वरुन आता किराणा मालही मागवता येणार, कंपनीच्या या सुविधेचा असा घेता येणार फायदा

Zomato वरुन आता किराणा मालही मागवता येणार, कंपनीच्या या सुविधेचा असा घेता येणार फायदा

झोमॅटो (Zomato) कंपनी आता लवकरच आपल्या अ‍ॅपवर एक ग्रॉसरी सेक्शन सुरू करणार आहे. त्यामुळे आता  झोमॅटोवरुन खाद्यपदार्थांसह किराणा सामान देखील (Glossary Shopping) ऑर्डर करता येणार आहे.

झोमॅटो (Zomato) कंपनी आता लवकरच आपल्या अ‍ॅपवर एक ग्रॉसरी सेक्शन सुरू करणार आहे. त्यामुळे आता झोमॅटोवरुन खाद्यपदार्थांसह किराणा सामान देखील (Glossary Shopping) ऑर्डर करता येणार आहे.

झोमॅटो (Zomato) कंपनी आता लवकरच आपल्या अ‍ॅपवर एक ग्रॉसरी सेक्शन सुरू करणार आहे. त्यामुळे आता झोमॅटोवरुन खाद्यपदार्थांसह किराणा सामान देखील (Glossary Shopping) ऑर्डर करता येणार आहे.

नवी दिल्ली, 9 जुलै : झोमॅटो (Zomato) कंपनी आता लवकरच आपल्या अ‍ॅपवर एक ग्रॉसरी सेक्शन सुरू करणार आहे. त्यामुळे आता  झोमॅटोवरुन खाद्यपदार्थांसह किराणा सामान देखील (Glossary Shopping) ऑर्डर करता येणार आहे. किराणा सामान खरेदी करण्यासाठी युजर्सला ग्रॉसरी सेक्शनमध्ये आपल्या सुविधेनुसार, एका आवडीच्या स्टोरची निवड करावी लागेल. हवं ते सामान कार्टमध्ये अ‍ॅड करुन पेमेंट करावं लागेल. ज्याप्रमाणे जेवण, खाणं ऑर्डर (Food Order)  केलं जातं, त्याचप्रमाणे ग्रॉसरीही ऑर्डर करता येणार आहे. पेमेंट केल्यानंतर दिलेल्या पत्त्यावर सामानाची डिलीव्हरी होणार आहे.

Zomato IPO -

झोमॅटो पुढील आठवड्यात आपला आयपीओ (Zomato IPO) लाँच करणार आहे. Zomato चे शेअर 27 जुलै रोजी स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होतील. याची किंमत 72-76 रुपये प्रति शेअर आहे. कंपनी 9000 कोटी रुपयांचं फ्रेश इश्यू जारी करणार असून 375 कोटी रुपयांचे शेअर ऑफर फॉर सेलमध्ये विक्री करेल.

Amazonवर या तारखेपासून स्वस्तात करा Shopping,स्मार्टफोनसह हजारो प्रोडक्ट्सवर सूट

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) भीतीमुळे कोविड-19 च्या पहिल्या लाटेमध्ये फूड डिलीव्हरी बिजनेसवर मोठा परिणाम झाला. परंतु आता सरफेस ट्रान्समिशनची (Surface Transmission) भीती संपली आहे आणि आम्ही मागील 18 महिन्यात फूड डिलीव्हरीच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या संक्रमणाशिवाय कोट्यवधी ऑर्डर्स घेतल्या आहेत.

मोठी बातमी! नव्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत WhatsApp नं घेतला मोठा निर्णय

झोमॅटोवर ग्रॉसरी ऑर्डर करण्यासाठीची सुविधा देणं ही मोठी संधी असून अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. आम्ही या क्षेत्रात सक्रियपणे प्रयोग करत आहोत. आम्ही पायलट आधारे आमच्या प्लॅटफॉर्मवर ग्रॉसरी डिलीव्हरी मार्केटप्लेस सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहोत, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

First published:
top videos

    Tags: Food, Tech news, Zomato