मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Amazon Prime Day: 26 जुलैपासून स्वस्तात Shopping ची संधी, स्मार्टफोनसह हजारो प्रोडक्ट्सवर भरभक्कम सूट

Amazon Prime Day: 26 जुलैपासून स्वस्तात Shopping ची संधी, स्मार्टफोनसह हजारो प्रोडक्ट्सवर भरभक्कम सूट

Amazon Prime Day 2021 on 26 July: तुम्हाला देखील स्वस्तात शॉपिंग करायची असेल, तर तुमची यादी तयार करून ठेवा. कारण लवकरच अ‍ॅमेझॉनचा हा सेल लाइव्ह जाणार आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 09 जुलै: ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज असणारी कंपनी अ‍ॅमेझॉन इंडिया (Amazon India) ने अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलच्या तारखांची (Amazon Prime Day 2021)  घोषणा केली आहे. दोन दिवसांच्या असणाऱ्या या सेलमध्ये तुम्हाला जबरदस्त शॉपिंग करता येणार आहे.  दोन दिवसांच्या या सेलमध्ये भारतात अ‍ॅमेझॉन प्राइम पाच वर्ष पूर्ण झाल्याचं यावर्षी सेलिब्रिशेन करत आहे. यावेळी विविध कॅटेगरीच्या प्रोडक्ट्समध्ये भरभक्कम सूट आणि आकर्षक ऑफर दिली जाणार आहे. तुम्ही देखील स्वस्तात खरेदी करू इच्छित असाल, तर आतापासून तुमची यादी तयार करा.

26 जुलैपासून होणार सेलला सुरुवात

Amazon Prime Day 2021 च्या सेलला 26 जुलैपासून सुरुवात होणार आहे आणि हा सेल 27 जुलैपर्यंत असणार आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम प्रोग्रॅममध्ये 200 मिलियन ग्राहक समाविष्ट आहेत. भारतासह 21 देशांमध्ये याचा विस्तार झाला आहे. अ‍ॅमेझॉन इंडिया (Amazon India) ने ना केवळ प्राइम ग्राहकांसाठी डील्स आणत आहे पण छोट्या व्यावसायिकांना देखील सपोर्ट करत आहे.

हे वाचा-बदलत आहे PF खात्याशी संबंधित हा नियम!आता या एका कारणामुळे नाही काढता येणार पैसे

आंतरराष्ट्रीय मेगा रिटेलर प्राइम ग्राहकांना अ‍ॅमेझॉन, लाँचपॅड, सहेली आणि कारीगरवर स्थानिक दुकानाअंतर्गत स्थानिक विक्रेते आणि निर्मात्यांना प्रोडक्ट्स शोधण्यात मदत करण्यासाठी डील्स आणत आहे.

हे वाचा-SBI च्या या खातेधारकांना 30 लाखांपर्यंत मिळेल लाभ, आहेत हे 5 बंपर फायदे

या प्रोडक्ट्सवर भरभक्कम सूट

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार यावेळी असणाऱ्या सेलमध्ये ग्राहकांना कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स, टीव्ही, अप्लायन्सेस, अ‍ॅमेझॉन डिव्हाइसेस, फॅशन अँड ब्यूटी, होम अँड किचन, फर्निचर, एव्हरीडे इसेन्शिअल व्यतिरिक्त अन्य प्रोडक्ट्सवर जबरदस्त ऑफर मिळणार आहे.

First published:

Tags: Amazon, Amazon subscription