नवी दिल्ली, 9 जुलै : WhatsApp च्या प्रायव्हसी पॉलिसीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. व्हॉट्सअॅपने दिल्ली हाय कोर्टाला शुक्रवारी त्यांनी नवी प्रायव्हसी पॉलिसी सध्या स्वेच्छिक केली असल्याचं सांगितलं आहे. जोपर्यंत डेटा प्रोटेक्शन बिल लागू होत नाही, तोपर्यंत प्रायव्हसी पॉलिसी स्वेच्छिक राहील. व्हॉट्सअॅप नवी प्रायव्हसी पॉलिसी सध्या लागू करणार नाही. याचा अर्थ प्रायव्हसी पॉलिसी अॅक्सेप्ट न केल्यासही युजरला ज्या सुविधांचा लाभ मिळतो आहे, तो सुरूच राहणार आहे. यावर कोणत्याही मर्यादा घालण्यात येणार नाहीत, असं व्हॉट्सअॅपकडून सांगण्यात आलं आहे.
Representing WhatsApp, senior Advocate Harish Salve tells Delhi HC that Whatsapp has responded to MEITY's notice seeking a response. "WhatsApp will not limit functionality for some time and continue to show users the updated until Data Protection Bill comes into force.", he adds
— ANI (@ANI) July 9, 2021
व्हॉट्सअॅपने दिल्ली हाय कोर्टत सांगितलं, की या प्रकरणी कोणतीही रेग्युलेटर बॉडी नाही. त्यामुळे याबाबत सरकारचं निर्णय घेईल. त्यामुळे आम्ही ही प्रायव्हसी पॉलिसी काही दिवसांसाठी लागू करणार नसल्याचं WhatsApp ने दिल्ली हाय कोर्टात सांगितलं आहे.
तुमच्या कामाची बातमी! Driving करताना चालानपासून वाचण्यासाठी डाउनलोड करा हे Apps
दिल्ली उच्च न्यायालय फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या याचिकेवर सुनावणी करत आहे. सुनावणीदरम्यान वरिष्ठ वकील हरिश साळवे यांनी कोर्टाला सांगितलं, की व्हॉट्सअॅपने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MEITY) नोटिशीला प्रतिसाद दिला आहे. बिल लागू होईपर्यंत व्हॉट्सअॅप काही काळ कार्यक्षमतेवर मर्यादा घालणार नाही.
दरम्यान, मागील महिन्यात केंद्राने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं, की वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक कायदा होण्यापूर्वीच WhatsApp युजर्सला नवी प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारण्यास सक्ती करत आहे. त्यानंतर आता WhatsApp ने जोपर्यंत डेटा प्रोटेक्शन बिल लागू होत नाही, तोपर्यंत प्रायव्हसी पॉलिसी स्वेच्छिक राहील, असं कोर्टात सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Whatsapp News, WhatsApp user