नवी दिल्ली, 31 डिसेंबर : गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) लाखोंच्या संख्येने अॅप्स आहेत. यापैकी काही अॅप्स फ्री आहेत, तर काही अॅप्स अॅक्सेस करण्यासाठी पेमेंट करावं लागतं. पैसे दिल्याशिवाय ते डाउनलोड करता येत नाहीत. अनेकदा खरेदी केलेलं अॅप समजत नाही. अशावेळी युजर्स अॅपसाठी भरलेली रक्कम रिफंड म्हणून परत मिळवू शकतात. परंतु रिफंडसाठी गुगलच्या काही पॉलिसीही पाहाव्या लागतात.
Google ने रिफंड पॉलिसी आपल्या वेबसाईटवर दिली आहे. जर रिफंड गुगलला मंजुर असेल, तर तीन ते पाच दिवसांत पैसे परत मिळतात. परंतु काही अॅपचे पैसे परत मिळत नाहीत.
48 तास वेळ मर्यादा -
अॅपसाठीचे पैसे परत मिळवण्याची वेळ मर्यादा 48 तास आहे. जर एखाद्याने तुमच्या कार्ड किंवा अकाउंटमधून नकळतपणे अॅपची खरेदी केली असल्यास, गुगलकडे 65 दिवसांत पैसे परत करण्याची वेळ आहे. जर एखादं अॅप डाउनलोड केल्यानंतर दोन तासांनंतर ते परत करायचं असल्यास, एक ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. गुगल अकाउंटवर लॉगइन केल्यानंतर हा फॉर्म मिळेल.
गुगल प्ले स्टोअरच्या अकाउंटमध्ये 'ऑर्डर हिस्ट्री' पाहिल्यास, खरेदीबाबत संपूर्ण माहिती मिळेल. जे अॅप परत करायचं आहे, त्यासोबत लिहिलेल्या रिफंडवर क्लिक करा, त्यानंतर पैसे परत मिळवण्याचं काम सुरू होऊ शकतं.