Home /News /technology /

Facebook सुरक्षेबाबत अधिक गंभीर; नव्या वर्षात येणार हे Security फीचर्स

Facebook सुरक्षेबाबत अधिक गंभीर; नव्या वर्षात येणार हे Security फीचर्स

फेसबुक (Facebook) आता सिक्योरिटीबाबत अधिक गंभीर झालं आहे. नव्या वर्षात फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवर अनेक ऍडव्हान्स सेफ्टी फीचर्स जोडणार आहे.

    नवी दिल्ली, 31 डिसेंबर : जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक (Facebook) आता सिक्योरिटीबाबत अधिक गंभीर झालं आहे. नव्या वर्षात फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवर अनेक ऍडव्हान्स सेफ्टी फीचर्स जोडणार आहे. फेसबुककडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, युजर्स सोशल नेटवर्क मोबाईल ऍपमध्ये लॉग इन करण्यापूर्वी त्याची ओखळ व्हेरिफाय करण्यासाठी फिजिकल सिक्योरिटीचा ऑप्शन देईल. सध्या डेस्कटॉपमध्ये प्रत्येक लॉग इनआधी कनेक्ट करण्यासाठी हार्डवेअर सिक्योरिटीची गरज असते. एक्सियोस साईटने दिलेल्या रिपोर्टनुसार, फेसबुकने सांगतिलं की, युजर्स रिटेलरकडून एक हार्डवेअर खरेदी करु शकतात. आणि ते फेसबुकसोबत रजिस्टर्ड करू शकतात. नव्या सिक्योरिटी सर्व्हिसेस जुलैमध्ये रोलआउट केल्या जातील. फेसबुक मोबाईल ऍपसाठी फिजिकल सिक्योरिटी कशी सेट कराल? युजर्सला आपल्या फेसबुक अकाउंटमध्ये हे फीचर ऍड करण्यासाठी टू स्टेप ऑथेंटिकेशनची आवश्यकता आहे. जे युजर टेक्स मेसेजद्वारे किंवा थर्ड पार्टी ऑथेंटिकेशनने पूर्ण करू शकतील. त्यानंतर एक हार्डवेअर डिवाईस खरेदी करावं लागेल, ज्यात यूनिवर्सल 2 फॅक्टर सपोर्ट असेल, ज्याला फेसबुक व्हेरिफिकेशन रुपात जोडावं लागेल. ही प्रोसेस एकदा पूर्ण झाल्यानंतर युजर आपल्या अकाउंटमध्ये लॉग इन करण्यासाठी या फिजिकल सिक्योरिटीला प्लग इन करावं लागेल. अमेरिकेत उपलब्ध - सध्या अमेरिकेत हे उपलब्ध आहे. फेसबुक नेते, सरकारी एजेन्सी आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त सुरक्षा देते. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि संभाव्य हॅकिंग धोक्यासाठी रियल मॉनिटरिंगही देते.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Facebook

    पुढील बातम्या