Home /News /technology /

OMG! नोरा फतेहीच्या ब्रँड न्यू BMW-5 Series लग्जरी कारची किंमत 61 लाख रुपये

OMG! नोरा फतेहीच्या ब्रँड न्यू BMW-5 Series लग्जरी कारची किंमत 61 लाख रुपये

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चननंतर आता हॉट डान्सिंग मूव्ह्जसाठी प्रसिद्ध असलेल्या नोरा फतेहीनेही (Norah Fatehi) लग्जरी कार खरेदी केली आहे. नोराने BMW ची लग्जरी सिडान कार 5 Series खरेदी केली आहे.

    मुंबई, 31 डिसेंबर : 2020 वर्षात अनेक समस्यांनंतर आता वर्षाच्या शेवटी अनेक जण वॅकेशनसाठी जात असून आपला स्ट्रेस कमी करताना दिसतात. तर दुसरीकडे अनेक सेलिब्रिटी नवीन गाड्या खरेदी करून आनंद व्यक्त करत आहेत. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चननंतर आता हॉट डान्सिंग मूव्ह्जसाठी प्रसिद्ध असलेल्या नोरा फतेहीनेही (Norah Fatehi) लग्जरी कार खरेदी केली आहे. नोराने BMW ची लग्जरी सिडान कार 5 Series खरेदी केली आहे. नोराला लग्जरी गाड्यांची आवड आहे. याआधी तिच्याकडे Mercedes-Benz CLA 220d कारही आहे. आता तिने BMW 5 Series ची कार खरेदी केली आहे. याची किंमत 55.40 लाख रुपये ते 68.39 लाखांपर्यंत आहे. BMW इंडियाच्या ऑफिशियल साईटने नोराचे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
    BMW 5 Series आपल्या सेगमेंटमधील बेस्ट सेलिंग कार्सपैकी एक आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल दोन्ही ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ही कार केवळ 5.1 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर ताशी धावण्यास सक्षम आहे. Norah Fatehi, BMW 5 series काही दिवसांपूर्वी अतिताभ बच्चन यांनीही एक लग्जरी गाडी खरेदी केली आहे. बिग बींनी S Class मर्सिडीज बेंज खरेदी केली. मिळालेल्या माहितीनुसार, या कारची किंमत 1 कोटी 38 लाख रुपये आहे.
    Published by:Karishma
    First published:

    पुढील बातम्या