मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Twitter वर ट्विट करून कमावता येणार पैसे; पाहा काय आहे प्रोसेस

Twitter वर ट्विट करून कमावता येणार पैसे; पाहा काय आहे प्रोसेस

Twitter Tips Feature च्या माध्यमातून युजरला ऑनलाईन पैसे पाठवण्याची आणि रिसिव्ह करण्याची सुविधा देण्यात येत आहे.

Twitter Tips Feature च्या माध्यमातून युजरला ऑनलाईन पैसे पाठवण्याची आणि रिसिव्ह करण्याची सुविधा देण्यात येत आहे.

Twitter Tips Feature च्या माध्यमातून युजरला ऑनलाईन पैसे पाठवण्याची आणि रिसिव्ह करण्याची सुविधा देण्यात येत आहे.

नवी दिल्ली, 1 डिसेंबर : प्रसिद्ध Microblogging Site ट्विटरवर वेगवेगळ्या प्रसिद्ध व्यक्ती तसंच युजर्स सतत सक्रिय असतात. ट्विटरच्या (Twitter Microblogging Site) माध्यमातून अनेक लोक आपली बेधडक भूमिका मांडत असतात. त्यामुळे मागच्या काही काळापासून ट्विटर चांगलंच चर्चेत आलेलं आहे. परंतु आता ट्विटर युजरला पैसे कमावण्याची (earn money by tweeting on Twitter) संधी देखील उपलब्ध करून देत आहे.

जर कोणत्याही युजरला एखाद्या प्रसिद्ध Twitter युजरचं काम आवडलं असेल, तर त्याला प्रतिसाद देण्यासाठी ट्विटरकडून Twitter Tips नावाचं (how much does twitter pay for tweets) फीचर देण्यात आलेलं होतं. ही सुविधा आधी केवळ आयफोन युजर्सला होती, परंतु आता Android युजर्ससाठीही ही सुविधा देण्यात येत आहे.

रिचार्ज संपला तरी आता नो टेन्शन! Jio देणार काही सेकंदात Data Loan

Twitter Tips Feature च्या माध्यमातून असं करा व्यवहार -

Twitter Tips Feature च्या माध्यमातून युजरला ऑनलाईन पैसे पाठवण्याची आणि रिसिव्ह करण्याची सुविधा देण्यात येत आहे. त्यासाठी सर्वात आधी प्रोफाईलवरून (how to make money on twitter 2021) फॉलो ऑप्शनच्या बाजूला असलेल्या Tips च्या Icon वर क्लिक करून ही प्रोसेस पूर्ण करता येऊ शकते.

काही मिनिटात चार्ज होणार Realme चा हा स्मार्टफोन; लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या

काय आहे प्रोसेस?

सर्वात आधी प्रोफाईल ओपन करा. त्यानंतर Edit वर क्लिक करा. त्यानंतर सर्विसवर General Tipping Policy ला Accept करा. त्यानंतर Allow च्या पर्यायावर क्लिक करून Third Party Payment Option वर प्रेस करा. त्यानंतर तुम्हाला ज्या युजरला पैसे पाठवायचे आहेत, त्या युजरला सेलेक्ट करा.

WhatsApp कडून यूजर्सना मिळणार Surprise; App मध्ये होणार मोठे बदल; जाणून घ्या

त्याचबरोबर ज्या युजरला पैसे पाठवायचे आहे त्या युजरचं Tips Icon Activate असायला हवं. त्यानंतर अमाउंट टाकून पैसे पाठवा. आता या फीचरमुळे ट्विटर युजर्सला ट्विट करण्याबरोबरच ऑनलाईन पेमेंट्सही करता येत आहे.

First published:
top videos

    Tags: Twitter, Twitter account, Twitter debate