नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून आघाडीवर असलेल्या व्हॉट्सअॅपने (WhatsApp) मागील काही दिवसांपासून युजर्ससाठी नवनवीन अपडेट्स आणलेले आहे. त्यातच आता व्हॉट्सअॅपने बीटा यूजर्ससाठीही (WhatsApp Beta) अॅपमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यामुळं आता युजर्सला त्याचा वापर करताना फायदा होणार आहे.
Beta यूजर्ससाठी नव्या रूपात असणार व्हॉट्सअॅप...
व्हॉट्सअॅपने आपल्या बीटा यूजर्ससाठी (whatsapp beta version features) एक नवं अपडेट जारी केलं आहे. ज्यात युजर्ससाठी व्हॉट्सअॅप आयकॉन बदलण्यात येणार आहे. आता बीटा युजर्ससाठी नवा शॉर्ट (whatsapp icon change) कट देण्यात आला असून आता व्हॉट्सअॅप 2.21.24.6 व्हर्जनवर काम करेल. त्याचबरोबर आता WhatsApp वर Video Call करणंही सोपं झालं आहे.
कारण WABetaInfo ने जारी केलेल्या एका रिपोर्टनुसार युजर्सला स्टेटस पाहतानाही Video Call करता येणार आहे. त्यासाठी स्मार्टफोनच्या स्क्रिनवर उजव्या बाजूला तीन डॉट्सचा पर्याय देण्यात आला आहे. त्याद्वारे युजर्सला या फीचर्सचा लाभ घेता येईल.
या फीचर्सला लाभ कोणत्या युजर्सला मिळेल?
व्हॉट्सअॅपने हे फीचर्स सर्व युजर्ससाठी लागू केलेले नाही. याचा फायदा त्याच युजर्सला घेता येईल जे बीटा व्हर्जनचा वापर करत आहेत. त्यामुळं आता हे अपडेट लवकरच iOS यूजर्ससाठीही लागू करण्यात येतील असं बोललं जात आहे. त्याचबरोबर WhatsApp ने या फीचरचा लाभ Android युजर्सलाही करता यावा यासाठी त्याची टेस्टिंग सुरू केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Whatsapp alert, WhatsApp features, Whatsapp New Feature