मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /'तुम्ही पॉर्न पाहत आहात, दंड भरा'; पोलिसांच्या नावाने नोटीस पाठवत हजारोंना गंडा

'तुम्ही पॉर्न पाहत आहात, दंड भरा'; पोलिसांच्या नावाने नोटीस पाठवत हजारोंना गंडा

'तुम्ही पॉर्न पाहत आहात, हा गुन्हा आहे. 3000 रुपये दंड भरावा लागेल, दंड न भरल्यास तुमचा कंप्यूटर ब्लॉक केला जाईल' असं पॉपअप नोटिसमध्ये लिहून येत आहे.

'तुम्ही पॉर्न पाहत आहात, हा गुन्हा आहे. 3000 रुपये दंड भरावा लागेल, दंड न भरल्यास तुमचा कंप्यूटर ब्लॉक केला जाईल' असं पॉपअप नोटिसमध्ये लिहून येत आहे.

'तुम्ही पॉर्न पाहत आहात, हा गुन्हा आहे. 3000 रुपये दंड भरावा लागेल, दंड न भरल्यास तुमचा कंप्यूटर ब्लॉक केला जाईल' असं पॉपअप नोटिसमध्ये लिहून येत आहे.

नवी दिल्ली, 26 जुलै: देशात कोरोना काळात सोशल मीडिया (Social Media), डिजीटल ट्रान्झेक्शनच्या (Digital Transaction) संख्येत मोठी वाढ झाली आहे. एकीकडे इंटरनेट, सोशल मीडियाचा वापर वाढत असताना दुसरीकडे ऑनलाईन फ्रॉड (Online Fraud), सायबर क्राईमच्या (Cyber Crime) संख्येतही मोठी वाढ झाली आहे. आतापर्यंत अनेक सायबर क्रिमिनल्सनी युजर्सला गंडा घातला असून मोठ्या प्रमाणात पैशांची फसणूक केली आहे. आता पुन्हा एकदा असाच एक ऑनलाईन फ्रॉडचा प्रकार समोर आला आहे.

पॉर्न (Porn) पाहण्याबाबतची पोलिसांच्या नावाने फिरणारी एक नोटिस सध्या चर्चेत आहे. ज्यावेळी युजर्सकडून इंटरनेटवर पॉर्न सर्च केलं जात आहे, त्यावेळी ब्राउजरमध्ये एक पॉपअप येतो. हा पॉपअप पोलिसांची नोटिस असल्याच्या नावाने येतो. 'तुम्ही पॉर्न पाहत आहात, हा गुन्हा आहे. 3000 रुपये दंड भरावा लागेल, दंड न भरल्यास तुमचा कंप्यूटर ब्लॉक केला जाईल' असं पॉपअप नोटिसमध्ये लिहून येत आहे.

अनेकांची फसणूक केल्यानंतर आता दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने कारवाई करत या फ्रॉड टोळीला अटक केली आहे. दोन जणांना चेन्नईतून अटक करण्यात आली आहेत. चौकशीदरम्यान एका लोकल मास्टर माईंडला ताब्यात घेण्यात आलं आहे. याचा भाऊ देशाबाहेर या फ्रॉड व्यवसाय ऑपरेट करत होता. लोकांची फसणूक करण्यासाठीचा टेक्निकल भाग तो देशाबाहेरुन कम्बोडियातून हँडल करत होता.

तु्म्हीही पॉर्न सर्च किंवा तुमच्या एक्सला स्टॉक केलं आहे का? Google ने आता उचललं मोठं पाऊल

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या फ्रॉडमध्ये आतापर्यंत 1000 हून अधिक लोकांची फसणूक झाली आहे. फसवणुकीनंतरही याबाबत आतापर्यंत एकही तक्रार पोलिसांत दाखल झालेली नाही. पोलिसांना सोशल मीडियाद्वारे या बनावट, फेक नोटिशीची माहिती मिळाली. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली.

ऑनलाईन पॉर्न पाहता? Google, FB ची तुमच्यावर नजर, असा ट्रॅक होतो तुमचा डेटा

पोलिसांच्या नावाने खोटी नोटिस पॉपअपवर पाठवणाऱ्या या टोळीच्या अनेक अकाउंट्सची माहिती मिळाली आहे. त्यांनी आतापर्यंत लाखो रुपये वसूल केले असून पोलिसांना 30 ते 40 लाख ट्रान्झेक्शनची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. अशा प्रकारे कोणताही फ्रॉड झाल्यास, सर्वात आधी पोलिसांत त्याबाबत तक्रार दाखल करणं गरजेचं आहे.

First published:
top videos

    Tags: Cyber crime, Online fraud, Tech news