Xiaomi च्या 20 स्मार्टफोनची फीचर्स बदलली; तुमचाही फोन करा चेक

Xiaomi च्या 20 स्मार्टफोनची फीचर्स बदलली; तुमचाही फोन करा चेक

Xiaomi मोबाईल धारकांसाठी आनंदाची बातमी. तुमच्याकडच्या फोनमध्ये नवीन फीचर्स मिळणार आहेत. त्यासाठी एक नवं सॉफ्टवेअर

  • Share this:

मुंबई, 18 ऑक्टोबर : सर्वाच्या खिशाला परवडणारा फोन कोणता असेल तर तो आहे Xiaomi. शाओमी स्मार्टफोनची काही फीचर्स बदलणार आहेत. नवे अपडेट्स डाउनलोड केलेत की ही फीचर्स उपलब्ध होतील. लो बजेट स्मार्टफोनमध्ये शाओमीने तगडी स्पर्धा निर्माण केली आहे. Xiaomi ने ग्राहकांना जोडून ठेवण्यासाठी त्यांच्या 20 स्मार्टफोन मध्ये MIUI 11 हे सॉफ्टवेअर लॉंच केलं आहे.

MIUI या सॉफ्टवेअरमुळे वाईड डार्क मोड (Wide Dark Mode) आणि नवीन साउंड ऑप्शन (New Sound Option) या सारख्या सुविधा ग्राहकांना आपल्या फोन मध्ये पाहायला मिळणार आहेत.

कंपनी हे सॉफ्टवेअर कोणत्या फोनमध्ये देणार आहे त्याची पूर्ण यादी दिली आहे. पण ही नवी फीचर्स कोणत्या दिवशी देणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

या फोन मध्ये होणार बदल...

1. पोको F1

2. शायोमी नोट 7

3. शायोमी रेडमी नोट 7 प्रो

4. शायोमी रेडमी K20 प्रो

5. शायोमी रेडमी K20

हे ही वाचा - OMG! हेअरस्टाइल बदलल्यामुळे प्रोड्युसरनं अभिनेत्याला दिली जीवे मारण्याची धमकी

6. शायोमी रेडमी 7A

7. शायोमी रेडमी 6

8. शायोमी रेडमी 6 आणि 6 प्रो

9. शायोमी रेडमी नोट 5 आणि 5 प्रो

10.शायोमी रेडमी S2

11.शायोमी रेडमी नोट 8 आणि 8 प्रो

12.शायोमी रेडमी 5 प्लस

13.शायोमी रेडमी 5

14.शायोमी रेडमी 5A

15.शायोमी रेडमी 4X

16.शायोमी रेडमी नोट 5A

या सॉफ्टवेअर अपडेटमुळे शायोमी मोबाईल धारकांना smooth animation experience मिळेल त्याच बरोबर सिस्टम वाइड डार्क मोड, नवीन डायनमिक साउंड इफेक्ट्स, डायनमिक फॉन्ट स्केलिंग, नवीन रिमांइडर फीचर्स, Mi गो ट्रॅव्हल आणि Mi वर्क स्वीट या सारखी फीचर्स मिळतील.

----------------------------------------------------------------

अन्य बातम्या

‘या’ एका कारणामुळं भारतात लॉंच झाला नाही Google Pixel 4

सेक्स व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, अर्ध्या तासात पाठवले 30 हजार ई-मेल

आता Alexa भरणार तुमचं वीज, पाणी, केबलचं बिल; काय असेल प्रक्रिया?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2019 09:47 PM IST

ताज्या बातम्या