OMG! हेअरस्टाइल बदलल्यामुळे प्रोड्युसरनं अभिनेत्याला दिली जीवे मारण्याची धमकी

OMG! हेअरस्टाइल बदलल्यामुळे प्रोड्युसरनं अभिनेत्याला दिली जीवे मारण्याची धमकी

सिने इंडस्ट्रीमध्ये अनेकदा एक अभिनेता एकापेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम करत असतात. त्यामुळे त्यांना वेळोवेळी लुक बदलावा लागतो.

  • Share this:

मुंबई, 18 ऑक्टोबर : सिने इंडस्ट्रीमध्ये अनेकदा एक अभिनेता एकापेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम करत असतात. त्यामुळे त्यांना वेळोवेळी लुक बदलावा लागतो. पण यासाठी एखाद्या प्रोड्युसरनं अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. मल्याळम सिनेमांचा अभिनेता शेन निगम यानं पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आहे. त्याला एका प्रोड्युसरनं जीवे मारण्याची धमकी दिल्याचं त्यानं म्हटलं आहे. तसेच या दिग्दर्शकानं माझी इमेज खराब करण्याचा प्रयत्न केला असल्याचंही शेनचं म्हणणं आहे.

शेन निगम काही दिवसांपूर्वी जॉबी जॉर्ज यांच्या प्रॉडक्शन हाउसचा सिनेमा 'वेयिल'चं शूट करत होता. मात्र एक शेड्युल पूर्ण झाल्यावर त्यानं त्याच्या दुसऱ्या सिनेमाच्या शूटिंगची तयारी सुरू केली. दरम्यान त्यानं त्याच्या लुकमध्ये काही बदल केले. खास करुन यामध्ये त्यानं आपली हेअरस्टाईल बदलली. नुकत्याच इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये शेन यानं असा दावा केला आहे की, वेयिल सिनेमाच्या जबाबदार व्यक्तींना विचारुनच आपण हे बदल केले होते.

‘वयाच्या 15 व्या वर्षी 8 लोकांनी माझ्यावर बलात्कार केला’, KBC स्पर्धकाचा खुलासा

या अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्यानं आपल्या लुकमध्ये बदल केले आणि हे फोटो व्हॉट्सअॅप डीपी आणि स्टेटस ठेवलं हे पाहिल्यावर 'वेयिल' सिनेमाचे प्रोड्युसर भडकले. त्यानी शेनला याबद्दल फक्त सुनावलंच नाही तर त्यांनी त्याला तुझं करिअर बरबाद करण्याची धमकी दिली. तसेच सोशल मीडियावरही त्याची इमेज खराब करेन असं म्हटलं. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर अखेरीस त्यांनी या अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. याबाबत या अभिनेत्यानं पोलिसांत तक्रार सुद्धा केली आहे.

निक जोनस ‘सबसे महान पती’, प्रियांका आणि भारतीय संस्कृतीवर म्हणाला...

 

View this post on Instagram

 

For Vanitha 2019 2'nd Edition :) #VanithaMagazine #Photoshoot

A post shared by Shane Nigam (@shanenigam_official) on

उल्लेखनिय बाब अशी की शेन निगम एक स्टारकिड आहे. त्याचे वडील अभि निगम सुद्धा मल्याळममधील प्रसिद्ध अभिनेता होते. मागच्या काही दिवसांत शेनच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं आहे. पण त्यापूर्वी, प्रसिद्ध अभिनेत्री पार्वतीवर सोशल मीडियावर अपशब्द वापरल्यानं तो वादात सापडला होता.

KBC 11 : 7 कोटींसाठी विचारला गांधीजी आणि फुटबॉलबद्दल प्रश्न, उत्तर माहित आहे का?

=======================================================

EXCLUSIVE VIDEO: काँग्रेस उमेदवाराच्या बाऊन्सरचं फोटोशूट वादात, पोलिसांच्या स्टेंनगण घेऊन दिल्या पोज

Published by: Megha Jethe
First published: October 18, 2019, 6:41 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading