मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Xiaomi ची जबरदस्त ऑफर, केवळ 499 रुपयांत मिळू शकतो हा 5G फोन

Xiaomi ची जबरदस्त ऑफर, केवळ 499 रुपयांत मिळू शकतो हा 5G फोन

Xiaomi ची वेबसाईट mi.com वर सध्या Redmi Days Sale सुरू आहे. या सेलमध्ये लेटेस्ट स्मार्टफोनवर मोठी सूट मिळू शकेल.

Xiaomi ची वेबसाईट mi.com वर सध्या Redmi Days Sale सुरू आहे. या सेलमध्ये लेटेस्ट स्मार्टफोनवर मोठी सूट मिळू शकेल.

Xiaomi ची वेबसाईट mi.com वर सध्या Redmi Days Sale सुरू आहे. या सेलमध्ये लेटेस्ट स्मार्टफोनवर मोठी सूट मिळू शकेल.

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : तुम्ही लेटेस्ट फीचर्ससह चांगला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. Xiaomi ने एक कमाल ऑफर आणली आहे. Xiaomi ची वेबसाईट mi.com वर सध्या Redmi Days Sale सुरू आहे. या सेलमध्ये लेटेस्ट स्मार्टफोनवर मोठी सूट मिळू शकेल. Redmi Days Sale 14 सप्टेंबरपासून सुरू झाला असून 18 सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

Redmi Note 10T 5G -

Redmi चा हा 5G स्मार्टफोन 4GB RAM आणि 64GB ROM, तसंच दूसरा 6GB RAM आणि 128GB ROM अशा दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. जर तुम्ही 64GB वेरिएंट घेत असाल, तर हा फोन 16,999 रुपयांऐवजी 14,999 रुपयांना पडेल. शिवाय एक्सचेंज ऑफरही सुरू असल्याने याचाही फायदा घेता येईल. एक्सचेंज ऑफरचाही संपूर्ण लाभ मिळाल्यास या जबरदस्त फोनवर 14,500 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. त्यामुळे फोनची किंमत केवळ 499 रुपये होईल.

तसंच 128GB मॉडेल खरेदी केल्यास, ते 18,999 रुपयांऐवजी 16,999 रुपयांना मिळेल.

सर्वसामान्यांना झटका! पुन्हा महागणार स्मार्टफोनच्या किंमती, हे आहे कारण

Redmi Note 10 Pro -

या फोनच्या 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. परंतु या सेलमध्ये हा फोन 17,999 रुपयांत खरेदी करता येईल. Mi Exchange अंतर्गत या फोनवर 17,500 रुपयांपर्यंतचा डिस्काउंटही मिळू शकतो.

तसंच, या फोनचं 8GB RAM आणि 128GB वेरिएंट 21,999 रुपयांऐवजी 18,999 रुपयांत खरेदी करता येईल. HDFC बँक क्रेडिट कार्डच्या वापरावर 1500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंटही मिळू शकतो.

आयफोन खरेदीची सुवर्णसंधी, iPhone 13 लाँच होताच स्वस्त झाला iPhone 11

Redmi 9 Prime -

4GB RAM आणि 64GB स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांऐवजी 10,499 रुपयांत मिळेल. या फोनवर 10,500 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही लागू आहे. याच फोनचं 4GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेल 13,999 रुपयांऐवजी 11,999 रुपयांत ऑफरमध्ये मिळेल.

Redmi Days Sale मध्ये असे अनेक स्मार्टफोन आहेत, जे अतिशय कमी किमतीत खरेदी करता येतील. Mi वेबसाईटवर या ऑफरचा फायदा घेता येईल.

First published:

Tags: Smartphone, Xiaomi, Xiaomi redmi