• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • आता तुमच्या चष्म्यातूनच काढा फोटो आणि करा कॉल्स; Xiaomi नं लाँच केले स्मार्ट ग्लासेस; वाचा Features

आता तुमच्या चष्म्यातूनच काढा फोटो आणि करा कॉल्स; Xiaomi नं लाँच केले स्मार्ट ग्लासेस; वाचा Features

हा चष्मा सर्वप्रथम चिनी बाजारात लॉंच करणार असून, त्यानंतर तो जागतिक बाजारात दाखल होईल.

 • Share this:
  फीचर फोन, स्मार्टफोन, स्मार्ट वॉच या यादीत आता स्मार्ट चष्मा किंवा स्मार्ट ग्लासेसचाही समावेश झाला आहे. स्मार्ट टेक्नोलॉजीमध्ये (Smart Technology) सध्या बाजारात विविध फीचर्सचा समावेश असलेले स्मार्टफोन, स्मार्टवॉचेस उपलब्ध आहेत. त्यात आता स्मार्ट चष्म्याची भर पडत आहे. स्मार्ट ग्लासेसचं (Xiaomi Smart Glasses) हे नवं तंत्रज्ञान लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहे. शाओमी (Xiaomi) ही दिग्गज चिनी कंपनी वैविध्यपूर्ण फीचर्स असलेला आणि वजनानं अत्यंत हलका असा स्मार्ट चष्मा बाजारात आणत आहे. हा चष्मा सर्वप्रथम चिनी बाजारात लॉंच करणार असून, त्यानंतर तो जागतिक बाजारात दाखल होईल. चीनमधली दिग्गज टेक्नोलॉजी कंपनी असलेल्या शाओमीनं एक नवा स्मार्ट चष्मा लॉंच केला आहे. शाओमी स्मार्ट ग्लासेस दिसायला अगदी सामान्य सनग्लासेसप्रमाणेच (Sunglass) आहेत; पण सेन्सर्ससह अनेक स्मार्ट फीचर्स इनेबल करण्यासाठी यात इमेजिंग सिस्टीम समाविष्ट करण्यात आली आहे. या स्मार्ट चष्म्यामध्ये कॉलिंग (Calls), मेसेजिंग (Message), नेव्हिगेशन (Navigation) आणि फोटो काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. या चष्म्याच्या माध्यमातून युजर्स कॉल करू शकतात. तसंच फोटोदेखील काढू शकतात. याशिवाय या चष्म्यात नेव्हिगेशन आणि रिअल-टाइम टेक्स्ट ट्रान्सलेशन आदी सुविधाही आहेत. तुम्ही अगदी डोळ्यासमोर तुम्हाला हव्या त्या शब्दाचं या चष्म्याच्या वापरातून भाषांतर (Translation) करू शकता. हे वाचा - बाबो! वयवर्ष 22 आणि त्याच्याकडे आहेत तब्बल अडीच कोटींची दोन घरं; तिशीपर्यंत 'इतकी' घरं घेऊन होणार रिटायर या स्मार्ट चष्म्याची किंमत नेमकी किती असेल, याबाबतचा खुलासा अद्याप कंपनीनं केलेला नाही. एका वृत्तानुसार, शाओमीचा हा स्मार्ट चष्मा सर्वप्रथम चिनी मार्केटमध्ये लॉंच केला जाईल. याचाच अर्थ हा चष्मा जागतिक बाजारात आणण्यापूर्वी चीनमधील बाजारात उपलब्ध होणार आहे. हा चष्मा वजनानं अत्यंत हलका असून, त्याचं वजन केवळ 51 ग्रॅम आहे. मेसेज आणि नोटिफिकेशन युजर्सच्या डोळ्यांसमोर प्रदर्शित व्हावेत, यासाठी या चष्म्यात मायक्रो एलईडी ऑप्टिकल वेबगाइड टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. या चष्म्यात 5 मेगापिक्सलचा कॅमेरा (Camera) आहे. यामुळे दुसऱ्यांचे फोटो काढणं शक्य होणार आहे. हा चष्मा ऑडिओ फॉरमॅटमधला मजकूर शब्दांमध्ये भाषांतरित करू शकतो, असा दावा कंपनीनं केला आहे. MicroLED मध्ये हाय पिक्सेल डेन्सिटी समाविष्ट करण्यात आली असून, तिचं स्ट्रक्चर अत्यंत सुलभ आहे. सर्व प्रकारच्या पुश नोटिफिकेशनव्यतिरिक्त यातला स्मार्ट होम अलार्म तुम्हाला ऑफिस अॅप्समधले महत्त्वाचे मेसेजही दर्शवेल. हा स्मार्ट चष्मा स्मार्टफोन युजर्ससाठी दुसरा स्क्रीन म्हणून काम करील. तसंच इंडिपेंडेंट ऑपरेटिंग कॉम्पिटिबिलिटीसह नवीन स्मार्ट टर्मिनल म्हणूनदेखील काम करील, असा दावा कंपनीने केला आहे.
  First published: