मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

नवा फोन घ्यायचा विचार करताय? आज लाँच होतोय Xiaomi 11 Lite NE 5G सुपर लाइट फोन, वाचा खास फीचर्स

नवा फोन घ्यायचा विचार करताय? आज लाँच होतोय Xiaomi 11 Lite NE 5G सुपर लाइट फोन, वाचा खास फीचर्स

Xiaomi आज भारतात आपला नवा स्मार्टफोन Xiaomi 11 Lite NE 5G लाँच करणार आहे. कंपनीचा हा सुपर लाइट फोन आज दुपारी 12 वाजता लाँच होईल. फोनचा लाँच इव्हेंट कंपनीच्या यूट्यूब चॅनेलवर लाइव्ह पाहता येईल.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : Xiaomi आज भारतात आपला नवा स्मार्टफोन Xiaomi 11 Lite NE 5G लाँच करणार आहे. कंपनीचा हा सुपर लाइट फोन आज दुपारी 12 वाजता लाँच होईल. फोनचा लाँच इव्हेंट कंपनीच्या यूट्यूब चॅनेलवर लाइव्ह पाहता येईल. हा फोन केवळ 6.81mm जाडीचा आहे आणि 158 ग्रॅम वजनाचा आहे. Xiaomi 11 Lite NE 5G फोन 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजसह येईल.

Xiaomi 11 Lite NE 5G Specifications -

- 2400x1080 पिक्सल रेजॉलूशनसह 6.55 इंची फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले

- फोन डिस्प्ले पंच-होल डिजाइनसह असून HDR 10+ सपोर्ट

- डिस्प्लेमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 240Hz टच सॅम्पलिंग रेट ऑफर

- 1 टीबीपर्यंत माइक्रो एसडी कार्ड सपोर्ट

- Adreno 670 GPU सह स्नॅपड्रॅगन 778 SoC चिपसेट

- OS Android 11

- 4250mAh बॅटरी

- 33 W फास्ट चार्जिंग सपोर्ट

108MP कॅमेरासह Xiaomi चा 5G फोन स्वस्तात खरेदीची संधी, पाहा काय आहे ऑफर

कॅमेरा -

फोटोग्राफीसाठी Xiaomi 11 Lite NE 5G फोनला LED Flash सह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आहे. तसंच 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 20 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला जात आहे.

कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5G शिवाय USB Type C port, 3.5mm हेडफोन जॅक, IR blaster, Wifi 6, ब्लूटूथ 5.2 आणि ड्यूअल फ्रिक्वेन्सी GPS सारखे ऑप्शन देण्यात आले आहेत.

Redmi-Realme ला टक्कर देण्यासाठी आता Flipkartचा मोबाइल लाँच,आहेत भन्नाट फीचर्स

काय असेल किंमत -

जागतिक स्तरावर Xiaomi 11 Lite NE 5G ची किंमत EUR 349, भारतीय रुपयानुसार जवळपास 30,200 रुपये आहे. भारतात या फोनच्या किंमतीचा अधिकृतरित्या खुलासा झाला नसून Mi 11 Lite पेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. सध्या भारतात Mi 11 Lite 21,999 रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध आहे.

First published:

Tags: Smartphone, Xiaomi