मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Redmi-Realme ला टक्कर देण्यासाठी आता Flipkartचा मोबाइल लाँच, स्वस्तात मिळतील भन्नाट फीचर्स

Redmi-Realme ला टक्कर देण्यासाठी आता Flipkartचा मोबाइल लाँच, स्वस्तात मिळतील भन्नाट फीचर्स

Buy Budget Smartphones: बजेट स्मार्टफोन आणण्याच्या स्पर्धेत आणखी एक दिग्गज कंपनी उतरली असून, आपला नवीन स्मार्टफोनदेखील तिनं दाखल केला आहे. ही कंपनी आहे ई-कॉमर्स क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणारी फ्लिपकार्ट (Flipkart Launched Budget Smartphone)

Buy Budget Smartphones: बजेट स्मार्टफोन आणण्याच्या स्पर्धेत आणखी एक दिग्गज कंपनी उतरली असून, आपला नवीन स्मार्टफोनदेखील तिनं दाखल केला आहे. ही कंपनी आहे ई-कॉमर्स क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणारी फ्लिपकार्ट (Flipkart Launched Budget Smartphone)

Buy Budget Smartphones: बजेट स्मार्टफोन आणण्याच्या स्पर्धेत आणखी एक दिग्गज कंपनी उतरली असून, आपला नवीन स्मार्टफोनदेखील तिनं दाखल केला आहे. ही कंपनी आहे ई-कॉमर्स क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणारी फ्लिपकार्ट (Flipkart Launched Budget Smartphone)

पुढे वाचा ...

  नवी दिल्ली, 28 सप्टेंबर: स्मार्टफोन (Good news for Smartphone users) वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मोबाइल उत्पादक कंपन्यांसाठी भारत ही प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. इंटरनेटचा विस्तार अगदी दूरपर्यंत होत असल्याने आणि अगदी स्वस्त किमतीत ते उपलब्ध होत आहे.  सर्वसामान्य वर्गातही पूर्वीच्या साध्या मोबाइल हँडसेटऐवजी अनेक फीचर्स असणारे स्मार्टफोन वापरण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे परवडणाऱ्या किमतीतल्या अत्याधुनिक फीचर्सनी सुसज्ज बजेट स्मार्टफोनची (Budget Smartphones) बाजारपेठ मोठी आहे. त्यामुळे या श्रेणीवर अनेक कंपन्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे.

  रेडमी (Redmi Budget Smartphones), रियलमीसह (Realme Budget Smartphones) अनेक नामांकित ब्रँड या श्रेणीत आपला हिस्सा मिळवण्यासाठी नवनवीन उत्पादनं आणत असतात. त्यामुळे या स्तरावर स्पर्धाही मोठी आहे. आता या स्पर्धेत आणखी एक दिग्गज कंपनी उतरली असून, आपला नवीन स्मार्टफोनदेखील तिनं दाखल केला आहे. ही कंपनी आहे ई-कॉमर्स क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणारी फ्लिपकार्ट (Flipkart Launched Budget Smartphones Brand).

  108MP कॅमेरासह Xiaomi चा 5G फोन स्वस्तात खरेदीची संधी, पाहा काय आहे ऑफर

  फ्लिपकार्टने इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी MarQ हा आपला ब्रँड स्थापन केला असून, यापूर्वी या ब्रँडअंतर्गत कंपनीनं स्मार्ट टीव्ही आणि स्पीकर्स आणले आहेत. आता या अंतर्गत कंपनीनं मोबाइल हँडसेटही सादर केले असून, MarQ M3 Smart हा आपला पहिला बजेट स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल केला आहे. याची किंमत 7999 रुपयांपासून पुढे असून, आगामी फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये (flipkart Big Billion Days Sale Date) तो उपलब्ध होईल. काही मर्यादित काळासाठी हा फोन सवलतीसह फक्त 6 हजार 299 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

  MarQ M3 Smart या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी असून, एकदा चार्जिंग केल्यावर ती 24 तासांचा बॅकअप देऊ शकते. या फोनवर सतत 9 तास चित्रपट पाहता येईल असा कंपनीचा दावा आहे. तसंच यात 1.6GHz ऑक्टा-कोअर प्रोसेसर आणि ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ड्युअल कॅमेरा सेटअपमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि दुसरा बोकेह लेन्ससह आहे. यात नाईट मोड, ब्यूटी मोड, स्लो मोशन अशी विविध फीचर्सही आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

  या स्मार्टफोन्सवर बंद होणार WhatsApp, कंपनीची मोठी घोषणा

  यामध्ये 2जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल स्टोअरेज आहे. इंटर्नल स्टोअरेज 256 GBपर्यंत वाढवता येतं. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि ब्लू अशा दोन रंगात येतो. या स्मार्टफोनमध्ये 6.088 इंचांचा डिस्प्ले असून, त्याचं रिझॉल्युशन 720 × 1,560 पिक्सेल आहे. स्क्रीन सुरक्षेसाठी 2.5 डी कर्व्हड ग्लास देण्यात आला आहे. बजेट फोनच्या श्रेणीत अनेक फीचर्सनी सुसज्ज असा हा फोन इतर बजेट स्मार्टफोन्सना नक्कीच तगडी टक्कर देणार आहे.

  First published:

  Tags: Flipkart, Mobile, Mobile app, Smartphone