Home /News /technology /

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk झाले 'बेघर'; आता शेवटचं घरही विकलं कारण...

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती Elon Musk झाले 'बेघर'; आता शेवटचं घरही विकलं कारण...

Elon Musk यांनी सॅन फ्रॅन्सिस्कोतील आपल्या घराची 30 मिलियन डॉलर्समध्ये विक्री केली. याआधीही त्यांनी आपली अनेक घरं विकली आहेत. परंतु आता विक्री केलेलं त्यांचं हे शेवटचं घर होतं.

  नवी दिल्ली, 9 डिसेंबर : सुप्रसिद्ध कार निर्माता कंपनी Tesla आणि SpaceX चे CEO Elon Musk यांनी आपलं शेवटचं घरं विकल्याची माहिती आहे. एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. शेवटचं घर विकल्यानंतर आता एलॉन मस्क यांच्याकडे एकही घर नाही. इतके श्रीमंत व्यक्ती असूनही त्यांना आपलं घर का विकावं लागलं असेल असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. आपल्या घरासह अनेक गोष्टी देखील ते विकणार असल्याचं यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं. Elon Musk यांनी सॅन फ्रॅन्सिस्कोतील आपल्या घराची 30 मिलियन डॉलर्समध्ये विक्री केली. याआधीही त्यांनी आपली अनेक घरं विकली आहेत. परंतु आता विक्री केलेलं त्यांचं हे शेवटचं घर होतं. बिजनेस इन्साइडरने आपल्या एका रिपोर्टमध्ये सांगितलं, की सॅन फ्रॅन्सिस्को बे एरियामध्ये एलॉन मस्क यांची 47 एकर प्रॉपर्टी होती. ही जागा त्यांनी 2 डिसेंबर रोजी 30 मिलियन डॉलर्समध्ये विकली.

  US VP कमला हॅरिस Bluetooth इयरफोन्सला घाबरतात, कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल

  सॅन फ्रॅन्सिस्कोतील हे घरं त्यांनी 2017 मध्ये 23 मिलियन डॉलर्समध्ये खरेदी केलं होतं. त्यानंतर त्यांनी इतर सर्व घरांची विक्री करण्यास सुरुवात केली. Musk अनेक दिवसांपासून आपलं घरं विकण्याबाबत चर्चेत होते. घर विकण्याबाबत त्यांना ट्विटरवर अनेकदा ट्रोलही करण्यात आलं होतं. हे घर विकल्यानंतर Elon Musk यांच्याकडे आता आपलं स्वत:चं एकही घर नाही. सध्या ते भाडेतत्वावर राहत असल्याची माहिती आहे.

  भारतात 2021 मध्ये सर्वाधिक Google Search केला गेला हा शब्द; तुम्हीही शोधला का?

  घरं विकण्यामागे काय आहे कारण? Elon Musk यांना 2050 पर्यंत 10 लाख लोकांना मंगळावर पाठवायचं आहे. इथे वसाहत निर्माण करण्यासाठी त्यांना आपली संपूर्ण प्रॉपर्टी विकायची असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. मे महिन्यात त्यांनी प्रॉपर्टी विकून मार्सवर अर्थात मंगळावर जाण्याचं म्हटलं होतं. त्याशिवाय पुढे जावून स्वत:कडे त्यांना कोणतंही घरं ठेवायाचं नसल्याचंही ते म्हणाले होते.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Elon musk, Tech news, Tesla, Tesla electric car

  पुढील बातम्या