Home /News /technology /

अमेरिकेच्या उप-राष्ट्रपती कमला हॅरिस Bluetooth इयरफोन्सला घाबरतात, कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल

अमेरिकेच्या उप-राष्ट्रपती कमला हॅरिस Bluetooth इयरफोन्सला घाबरतात, कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल

कमला हॅरिस ब्लूटूथ हेडफोन्सच्या ऐवजी वायर्ड हेडफोन्सचा वापर करतात. यामागचं कारण अतिशय हैराण करणारं आहे.

  नवी दिल्ली, 9 डिसेंबर : भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उप-राष्ट्रपती आहेत. अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष म्हणून जो बायडेन (Joe Biden) यांनी तर, उपाध्यक्ष म्हणून कमला हॅरिस यांनी जानेवारीमध्ये शपथ घेतली. कमला हॅरिस यांनी Joe Biden यांचं US इलेक्शन जिंकल्याबाबत अभिनंदन केलं होतं. कमला हॅरिस त्यांच्याशी फोनवर बोलत होत्या, पण त्यांच्या दुसऱ्या हातात वायर्ड हेडफोन्स होते. Kamala Harris यांना इतर ठिकाणीही अनेकदा वायर्ड हेडफोन्सचा वापर करताना पाहण्यात आलं आहे. Politico च्या रिपोर्टनुसार, कमला हॅरिस ब्लूटूथ हेडफोन्सच्या ऐवजी वायर्ड हेडफोन्सचा वापर करतात. यामागचं कारण अतिशय हैराण करणारं आहे. Politico नुसार, अमेरिकेच्या उप-राष्ट्रपती आपली सुरक्षा आणि टेक्नोलॉजीबाबत अतिशय काळजीपूर्वक आहेत. कमला हॅरिस ब्लूटूथ हेडफोन्सच्या जागी वायर्ड हेडफोन्सचा वापर करतात, परंतु एक्सपर्ट्सनी, त्या असं योग्यच करत असल्याचं म्हटलं आहे. CNet च्या रिपोर्टनुसार सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, ब्लूटूथ कनेक्शन हॅक केलं जाऊ शकतं. रिपोर्टनुसार, सायबर क्रिमिनल्स ब्लूटूथ कनेक्शन हॅक करुन डिव्हाइस कंट्रोल करू शकतात. यात मॅलिशियस कोड टाकून हॅकर्स बोलणं ऐकू शकतात. Citizen Labs चे सिनियर रिसर्चर John Scott Railton नुसार, कमला हॅरिस हा धोका ओळखतात. क्लोज अॅक्सेस अटॅकचा धोकाही या हेडफोन्सबाबत आहे. त्याशिवाय ब्लूटूथ ट्रॅकिंग आणि सिग्नल कलेक्शनचाही धोका आहे.

  Twitter CEO Parag Agrawal यांचा CV व्हायरल, मोठी बाब उघडकीस

  यावर्षी जुलैमध्ये US नॅशनल सिक्युरिटी एजेन्सी NSA ने एक रिपोर्ट पब्लिश केला होता. यात Bluetooth टेक्नोलॉजीच्या धोक्याबाबत सांगण्यात आलं होतं. Bluetooth टेक्नोलॉजीने डेटा वायरलेसली शॉर्ट डिस्टेंटपर्यंत ट्रान्सफर केला जाऊ शकतो. हॅकर्स Bluetooth सिग्नल स्कॅन करुन टार्गेट डिव्हाइसबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात.

  भारतात 2021 मध्ये सर्वाधिक Google Search केला गेला हा शब्द; तुम्हीही शोधला का?

  NSA ने दिलेल्या माहितीनुसार, Bluetooth चा वापर करुन पासवर्ड आणि सेंसिटिव्ह डेटा ट्रान्सफर करू नये. कॉमन पब्लिक जर आपला डेटा हॅक होण्याबाबत चिंतेत असतील, तर त्यांनीही Bluetooth केवळ गरज असेल त्याचवेळी ऑन करावं. इतर वेळी ब्लूटूथ ऑफ ठेवणं फायद्याचं ठरतं.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Kamala Harris, Tech news

  पुढील बातम्या