नवी दिल्ली, 7 मार्च : जगभरात अनेकांना वेगवेगळ्या गोष्टींची आवड असते. लग्जरी घरं, गॅजेट्स, लग्जरी कार्सचा अनेकांना शौक असतो. तसंच काहीना महागडे फोन ठेवण्याचीही मोठी आवड असते. महागातला महाग फोन कितीला असेल? भारतात अॅपलचा आयफोनही दीड लाखांपर्यंत येतो. पण काही असे फोन आहेत, ज्या एकाच फोनच्या किंमतीत नवी BMW येईल.
Falcon Supernova I phone 6 pink diamond -
किंमत - 48.5 मिलियन डॉलर
मॅन्युफॅक्चरर - अॅपल
हेडक्वाटर - US
डिझाइन - फॅलकॉन
हा जगातील सर्वात महागडा आणि लग्जरी फोन मानला जातो. फॅलकॉन सुपरनोवा आयफोन 6 पिंक डायमंड, हे आयफोन 6 चं कस्टमाईज्ड मॉडेल आहे, जे यूएसच्या लग्जरी ब्रँड फॅलकॉनने तयार केलं आहे. हा फोन 24 कॅरेट गोल्डने बनलेला असून यात हिरे लावण्यात आले आहेत. याचं कव्हरही रोज गोल्ड आणि प्लॅटिनमपासून बनवण्यात आलं आहे. पिंक डायमंडचा फोन सर्वात महाग असून त्यानंतर ऑरेंज आणि ब्लू डायमंडचा फोन बनवण्यात आला.
iPhone 4S Elite Gold -
किंमत - 9.4 मिलियन डॉलर
मॅन्युफॅक्चरर - अॅपल
हेडक्वाटर - US
डिझाइन - Stuart Hughes
हा 2019 मधील सर्वात किंमती आणि लग्जरी फोन होता. हा फोन डिझाइन करणारी कंपनी Stuart Hughes ने हा फोन बनवून संपूर्ण जगाला हैराण केलं होतं. याला अॅपलच्या iPhone 4S वर तयार करण्यात आलं आणि यावर जवळपास 500 हिरे लावण्यात आले. हा संपूर्ण फोन 24 कॅरेट गोल्डचा असून मागील अॅपलचा
लोगोही 53 हिऱ्यांनी कव्हर करण्यात आला आहे. यात प्लॅटिनमसह डायनासोरच्या खऱ्या हाडाचा तुकडाही वापरण्यात आला आहे.
Stuart Hughes iPhone 4 Diaomond rose -
किंमत - 8 मिलियन डॉलर
मॅन्युफॅक्चरर - अॅपल
हेडक्वाटर - US
डिझाइन - Stuart Hughes
Stuart Hughes द्वारा बनवण्यात आलेला हा लग्जरी फोन 2019 मध्ये जगातील टॉप तीन लग्जरी आणि महागड्या फोनपैकी एक होता. यातही जवळपास 500 हिरे लावण्यात आले होते. फोनच्या स्टार्ट बटनचा भागही दुर्मिळ 7.4 कॅरेटच्या सिंगल कट हिऱ्यांनी कव्हर करण्यात आला होता.
Goldstriker iPhone 3GS Supreme -
किंमत - 3.2 मिलियन डॉलर
मॅन्युफॅक्चरर - अॅपल
हेडक्वाटर - US
डिझाइन - Stuart Hughes
वरील फोन तयार करणाऱ्या कंपनीनेच हा फोनही तयार केला होता. हा फोन ब्रिटिश डिझायनर Stuart Hughe आणि त्यांची कंपनी Goldstriker ने 271 ग्रॅमच्या 22 कॅरेटच्या सॉलिड गोल्ड आणि 200 हिऱ्यांसह तयार केला होता. अॅपलच्या लोगोला 53 हिरे आणि स्टार्ट बटनलाही एक हिरा लावण्यात आला होता. हा फोन ऑस्ट्रेलियन बिजनेसमॅनसाठी तयार करण्यात आला होता.
iPhone 3G Kinga Button -
किंमत - 2.5 मिलियन डॉलर
मॅन्युफॅक्चरर - अॅपल
हेडक्वाटर - US
डिझाइन - Peter Alisson
ऑस्ट्रेलियन ज्वेलर Peter Alisson ने हा फोन तयार आणि डिझाइन केला आहे. यात स्टार्ट बटनला एका हिऱ्याच्या रुपात लावण्यात आलं होतं. या फोनला 18 कॅरेटचे पिवळे, सफेद आणि रोज गोल्ड हिरे लावण्यात आले होते. तर फोनच्या साइड स्ट्रिपमध्ये 138 हिरे लावण्यात आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Iphone, Smartphone, Super expensive