LPG Gas Cylinder Subsidy Status: तुमच्या अकाउंटमध्ये गॅस सबसिडी येते का? असं तपासा

अनेक लोक घरगुती गॅस सिलेंडरची सबसिडी खात्यामध्ये येण्याबाबत गोंधळात असतात, त्यांना सबसिडी येते की नाही याबाबत माहिती मिळत नाही. परंतु यासाठी एक पद्धत आहे, ज्याद्वारे गॅस सबसिडी बँक खात्यात आली की नाही ते समजू शकतं.

अनेक लोक घरगुती गॅस सिलेंडरची सबसिडी खात्यामध्ये येण्याबाबत गोंधळात असतात, त्यांना सबसिडी येते की नाही याबाबत माहिती मिळत नाही. परंतु यासाठी एक पद्धत आहे, ज्याद्वारे गॅस सबसिडी बँक खात्यात आली की नाही ते समजू शकतं.

 • Share this:
  नवी दिल्ली, 7 मार्च : नुकतीच पुन्हा एकदा एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Cylinder) किंमतीत वाढ झाली आहे. एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 1 मार्च रोजी पुन्हा एकदा 25 रुपयांची वाढ करण्यात आली. मागील काही वर्षांपासून सरकारने गॅस सिलेंडरमध्ये मिळणारी सबसिडी बँक खात्यात देण्यास सुरुवात केली आहे. परंतु अनेक लोक घरगुती गॅस सिलेंडरची सबसिडी खात्यामध्ये येण्याबाबत गोंधळात असतात, त्यांना सबसिडी येते की नाही याबाबत माहिती मिळत नाही. परंतु यासाठी एक पद्धत आहे, ज्याद्वारे गॅस सबसिडी बँक खात्यात आली की नाही ते समजू शकतं. या वेबसाईटवर लॉगइन करा - यासाठी आपल्या मोबाईल ब्राउजरमध्ये www.mylpg.in वेबसाईटवर लॉगइन करा. यात उजव्या बाजूला वर गॅस कंपन्यांच्या नावातून आपल्या सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीचं नाव सिलेक्ट करा. त्यानंतर युजरकडे एलपीजी आयडी मागितला जाईल. तो भरल्यानंतर आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि सध्याचं चालू वर्ष सिलेक्ट करा. त्यानंतर सबसिडीचे संपूर्ण डिटेल्स समोर येतील.

  (वाचा - कमी पैशात सुरू करा हा जबरदस्त व्यवसाय; दर महिन्याला होईल 40 हजारांपर्यंत कमाई)

  या डिटेल्समध्ये आपल्या खात्यात दरमहा पाठवल्या जाणाऱ्या सबसिडीच्या रकमेचा तपशील असेल. समजा जर खात्यात सबसिडीची रक्कम येत नसेल, तर त्वरित फीडबॅक बटणवर क्लिक करून आपली तक्रार दाखल करता येऊ शकते.

  (वाचा - महत्त्वाची बातमी!31 मार्चपूर्वी PAN कार्ड आधारशी लिंक करा;अन्यथा भरावा लागेल दंड)

  सबसिडी न मिळण्याचं मोठं कारण - सबसिडी न येण्याचं सर्वात मोठं कारणं म्हणजे एलपीजी आयडी, अकाउंट नंबरशी न जोडलेला असणं हे सांगितलं जातं. यासाठी ग्राहक आपल्या जवळच्या डिस्ट्रिब्यूटरशी संपर्क करू शकतात आणि त्याला आपल्या समस्येबद्दल सांगू शकतात. तसंच टोल फ्री नंबर 18002333555 वर कॉल करून ग्राहक आपली तक्रार दाखल करू शकतात.
  Published by:Karishma Bhurke
  First published: