मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

'हा' ठरला जगातील सर्वात पॉप्युलर Android Smartphone; किंमतही बजेटमध्ये, जाणून घ्या फीचर्स

'हा' ठरला जगातील सर्वात पॉप्युलर Android Smartphone; किंमतही बजेटमध्ये, जाणून घ्या फीचर्स

2020 मध्ये विक्री झालेल्या 100 पैकी सर्वाधिक विक्री झालेला अँड्रॉईड स्मार्टफोन (android smartphone) कोणता याबाबत माहिती समोर आली आहे.

2020 मध्ये विक्री झालेल्या 100 पैकी सर्वाधिक विक्री झालेला अँड्रॉईड स्मार्टफोन (android smartphone) कोणता याबाबत माहिती समोर आली आहे.

2020 मध्ये विक्री झालेल्या 100 पैकी सर्वाधिक विक्री झालेला अँड्रॉईड स्मार्टफोन (android smartphone) कोणता याबाबत माहिती समोर आली आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 7 मार्च : अँड्रॉईड (Android) फोन जवळपास प्रत्येक ब्रँडसह जगात प्रमुख मोबाईल प्लॅटफॉर्म बनला आहे. अँड्रॉईडच्या शाओमी (Xiaomi), वनप्लस (OnePlus), सॅमसंग (Samsung), विवो (Vivo) या सर्वच ब्रँड्सची बाजारात चांगलीच धूम आहे. 2020 मध्ये विक्री झालेल्या 100 पैकी सर्वाधिक विक्री झालेला अँड्रॉईड स्मार्टफोन (android smartphone) कोणता याबाबत माहिती समोर आली आहे.

मार्केट रिसर्च फर्म Omdia नुसार, 2020 मधील अँड्रॉईड फोनमध्ये सर्वाधिक सॅमसंग गॅलेक्सी A51 (Samsung Galaxy A51) या फोनची विक्री झाली आहे. Omdia ने दिलेल्या माहितीनुसार, सॅमसंगने 2020 मध्ये गॅलेक्सी A51ची 23.3 मिलियन (जवळपास 2 कोटी 32 लाख) युनिट विक्री झाली आहे.

जगातील सर्वात विक्री झालेला स्मार्टफोन आयफोन 11 होता. टॉप 10 स्मार्टफोन्सच्या लिस्टमध्ये पाच अँड्रॉईड स्मार्टफोन आणि पाच आयफोन होते. पाच अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये चार फोन सॅमसंगचे आणि एक फोन शाओमीचा आहे.

Omdia नुसार, Apple ने 2020 मध्ये आयफोन 11 ची 64.8 मिलियन (6 कोटी 48 लाख) विक्री केली. हा आयफोन दुसऱ्या क्रमांकावर आहे, जो जगातील बेस्ट सेलिंग फोन आहे.

(वाचा - जगातला पहिला 18GB रॅम असणारा स्मार्टफोन लाँच; पाहा किती आहे किंमत)

काय आहेत गॅलेक्सी A51 चे फीचर्स -

- 6.5 इंची फुल HD+ सुपर AMOLED इंफिनिटी-O डिस्प्ले

- HD+ 2040×1080 पिक्सल रिजोल्यूशन

- पंच होल डिस्प्ले

- इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर

- फेस अनलॉक फीचर्स

- 4000mAh बॅटरी

- 15W फास्ट चार्जिंग

- चार्जिंगसाठी SB Type-C port

(वाचा - ...तर Whatsapp वर तुम्हाला मेसेज पाठवता येणार नाहीत; कंपनीकडून युजर्सला रिमांइडर)

कॅमेरा -

Samsung Galaxy A51 फोनला चार रियर कॅमेरा देण्यात आले आहेत. ज्यात 48 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर, 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि 5 मेगापिक्सल डेडिकेटेड डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. कॅमेरा सेटअप 240fps वर स्लो मोशन व्हिडीओ सपोर्ट करतो.

सॅमसंग गॅलेक्सी A51 ची भारतात 20,999 रुपये इतकी किंमत आहे. हा फोन ब्लू, व्हाईट आणि ब्लॅक प्रिजम क्रश कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

First published:

Tags: Iphone, Samsung, Samsung galaxy, Smartphone