• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Women’s Day 2021: Facebook साठी वापरा या सेफ्टी टिप्स, असं करा आपलं अकाउंट सुरक्षित

Women’s Day 2021: Facebook साठी वापरा या सेफ्टी टिप्स, असं करा आपलं अकाउंट सुरक्षित

Have I Been Pwned? चा अनेक पासवर्ड मॅनेजरद्वारा वापर केला जातो. ही वेबसाईट तुमच्या ईमेल किंवा फोन नंबरवरुन, तुमचा फोन किंवा ईमेल डेटा लीकमध्ये सामिल आहे की नाही याची माहिती मिळवते.

Have I Been Pwned? चा अनेक पासवर्ड मॅनेजरद्वारा वापर केला जातो. ही वेबसाईट तुमच्या ईमेल किंवा फोन नंबरवरुन, तुमचा फोन किंवा ईमेल डेटा लीकमध्ये सामिल आहे की नाही याची माहिती मिळवते.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या सुरक्षा हा अनेक महिलांसाठी मोठा चिंतेचा विषय ठरतो आहे. परंतु अशा काही टिप्स आहेत, ज्याने महिला त्यांचं फेसबुक (facebook) अकाउंट सुरक्षित ठेऊ शकतात.

 • Share this:
  नवी दिल्ली, 8 मार्च : इंटरनेटच्या माध्यमातून महिलांना अनेक चांगल्या संधी मिळाल्या आहेत, तर अनेक महिलांना यामुळे असुरक्षितही वाटलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या सुरक्षा हा अनेक महिलांसाठी मोठा चिंतेचा विषय ठरतो आहे. परंतु अशा काही टिप्स आहेत, ज्याने महिला त्यांचं फेसबुक (facebook) अकाउंट सुरक्षित ठेऊ शकतात. टू फॅक्टर Authentication - आपलं फेसबुक अकाउंट कोणीही एक्सेस करणार नाही याकडे लक्ष देणं सर्वात महत्त्वाचं आहे. आपला प्रोफाईल पासवर्ड कोणाशीही शेअर करू नये. तसंच एक्स्ट्रा लेयर सिक्योरिटीसाठी 'टू फॅक्टर ऑथेंटिकेशन' हा पर्यायही आहे. हा फीचर एनेबल करून काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. - यासाठी सर्वात आधी Settings मध्ये जावं लागेल. - Security and Login वर क्लिक करा. - त्यानंतर two factor authentication वर क्लिक करावं लागेल. यात Edit वर क्लिक करून Enable करा.

  (वाचा - Alert! बनावट FASTag बाबत वेळीच सावध व्हा; अशी करा तक्रार)

  Login Alerts - ऑगइन अलर्ट्स नेहमी ऑन ठेवावं. यासाठी सर्वात आधी Security मध्ये जा, Security and Login वर क्लिक करा. त्यानंतर ‘Get Alerts about unrecognized logins’ वर क्लिक करा. त्यानंतर Edit वर क्लिक करुन अलर्ट टाईप सिलेक्ट करा. त्यानंतर Save Changes करा. Profile Lock - फेसबुक प्रोफाईल फोटोच्या सुरक्षेसाठी प्रोफाईल लॉक करणं चांगला पर्याय आहे. प्रोफाईल लॉक केल्यास, जे लोक फ्रेंड लिस्टमध्ये नाहीत, ते तुमचा फोटो, पोस्ट किंवा टाईमलाईन पाहू शकत नाहीत. त्यामुळे कोणताही फोटो डाउनलोड होण्याचाही धोका नाही.

  (वाचा - LPG Gas Cylinder Subsidy Status:तुमच्या अकाउंटमध्ये गॅस सबसिडी येते का?असं तपासा)

  Trusted Contacts Setup - फेसबुक सेटिंग्ज आणि Security & Login मध्ये जाऊन 3 ते 5 फेसबुक फ्रेंड्सना आपला ट्रस्टेड कॉन्टॅक्ट्स बनवू शकता. जर चुकून काही कारणांनी फेसबुक अकाउंट हॅक झालं किंवा पासवर्ड विसरल्यास हे ट्रस्टेड कॉन्टॅक्ट्स मदत करू शकतात.
  Published by:Karishma
  First published: