नवी दिल्ली, 28 जानेवारी : कोरोना काळात डिजीटल पेमेंटमध्ये
(Digital Payment) मोठी वाढ झाली. पण फोनमध्ये इंटरनेट
(Internet) नसताना पैसे ट्रान्सफर करण्यासाठी समस्या येते. पण आता यासाठीही टेन्शनची गरज नाही. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात
(NPCI) ने यावर मार्ग काढला आहे. आता विना इंटरनेट कनेक्शनही UPI बेस्ड डिजीटल पेमेंट करणं शक्य होईल. याला NPCI ने यूपीआय लाइट
(UPI Light) असं म्हटलं आहे. सध्या या फीचरवर काम सुरू आहे. ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा तुलनेने कमी असल्याने याचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील लोकांना होईल असं सांगण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,
UPI Light चं टेस्टिंग सर्वात आधी ग्रामीण भागात 200 रुपयाहून कमी पेमेंटसाठी होईल. यासाठी RBI कडूनही ग्रीन सिग्नल मिळाला आहे. RBI ने 5 जानेवारी रोजी विना इंटरनेट कनेक्शन 200 रुपयांपर्यंतच्या डिजीटल पेमेंट्सला मंजुरी दिली आहे. कसा करता येईल UPI Light चा वापर -
SIM Overlay -
SIM Overlay मध्ये टेक्निकली अनेक विशेष फीचर्स जोडले जातील. यामुळे तुम्ही विना इंटरनेट पेमेंट करू शकता. टेलिकॉम ऑपरेटरच्या मदतीने युजर्सच्या मोबाइल फोनमध्ये टेक्निक जोडलं जाईल. यासाठी युजर्सला टेलिकॉम स्टोरवर जावून हे काम करावं लागेल. पेमेंटसाठी टेलिकॉम नेटवर्कचा वापर केला जाईल.
इंटरनेटऐवजी SMS द्वारे होईल काम -
यासाठी UPI ID तयार करावा लागेल, ज्यात SMS चा वापर केला जाईल. UPI ID क्रिएट झाल्यानंतर युजर कॉन्टॅक्ट लिस्टमधून नाव सिलेक्ट करतील आणि अमाउंट टाइप केल्यानंतर पेमेंट होईल. पण यासाठी समोरच्या व्यक्तीकडेही अर्थात ज्याला पैसे पाठवायाचे आहेत, त्याच्याकडेही UPI ID असणं गरजेचं आहे. त्याच्यासोबत एक पीन नंबर सेट करावा लागेल. ही प्रक्रिया सोपी असून यात इंटरनेट नाही, तर केवळ SMS ची गरज असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.