Home /News /technology /

Aadhaar Update:युजर्ससाठी मोठी बातमी, आधार अपडेटसाठी नवी सर्विस; UIDAI ने दिली माहिती

Aadhaar Update:युजर्ससाठी मोठी बातमी, आधार अपडेटसाठी नवी सर्विस; UIDAI ने दिली माहिती

अनेकदा आधारमध्ये नाव, पत्ता, जन्मतिथी बदलण्याची गरज भासते. कधी नवं आधार कार्डही बनवावं लागतं. या बदलांसाठी आधार सेंटर (Aadhaar Centre) जाण्याची गरज पडणार नाही. घरबसल्या तुम्ही अपॉईंटमेंट (Aadhaar Appointment) घेऊ शकता.

  नवी दिल्ली, 26 जानेवारी : प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड (Aadhaar Card) अत्यावश्क डॉक्युमेंट आहे. आधार कार्ड केवळ ओळखपत्रच नाही, तर अनेक सरकारी आणि खासगी कामांसाठीही हे अनिवार्य आहे. आधार यूनिक डॉक्युमेंट असून यात महत्त्वाची माहिती असते. लहान मुलांच्या अॅडमिशनपासून सरकारी फॉर्म भरण्यापर्यंत आधार कार्डचा वापर केला जातो. आधार कार्ड करा अपडेट - अनेकदा आधारमध्ये नाव, पत्ता, जन्मतिथी बदलण्याची गरज भासते. कधी नवं आधार कार्डही बनवावं लागतं. या बदलांसाठी आधार सेंटर (Aadhaar Centre) जाण्याची गरज पडणार नाही. घरबसल्या तुम्ही अपॉईंटमेंट (Aadhaar Appointment) घेऊ शकता आणि आधार सेवा केंद्रात लांब रांगांपासून वाचू शकता. आधार अपडेटसाठी कशी घेता येईल अपॉईंटमेंट -

  हे वाचा - भाडेकरु Aadhaar मध्ये कसा करतील Address Update, पाहा UIDAI ची सोपी प्रोसेस

  अशी शेड्युल करा ऑनलाइन अपॉईंटमेंट? - सर्वात आधी https://uidai.gov.in/ वर जा. - My Aadhaar वर क्लिक करा आणि Book a appointment निवडा. - Book appointment in aadhar centre निवडा. - ड्रॉपडाउनमध्ये आपलं शहर आणि ठिकाण निवडा. - Proceed to book appointment वर क्लिक करा. - मोबाइल नंबर टाका. त्यानंतर New Aadhaar किंवा Aadhaar Update टॅबवर क्लिक करा. - Captcha Code टाका आणि जनरेट OTP वर क्लिक करा. - OTP टाका आणि वेरिफिकेशनवर क्लिक करा. - वैयक्तिक तपशील आणि पत्ता टाका. - टाइम स्लॉट निवडा आणि Next वर क्लिक करा. आता तुमची आधार कार्डसाठीची अपॉईंटमेंट बुक होईल.

  हे वाचा - Aadhaar Card संबंधी कोणतीही समस्या एका कॉलवर सोडवली जाईल, या क्रमांकावर करा कॉल

  Appointment द्वारे होतील ही कामं - - नवी आधार नोंदणी - नाव अपडेट - पत्ता अपडेट - मोबाइल नंबर अपडेट - ईमेल आयडी अपडेट - जन्मतिथी अपडेट - लिंग अपडेट - बायोमेट्रिक अपडेट
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Aadhar card, Aadhar card on phone, M aadhar card

  पुढील बातम्या