नवी दिल्ली, 22 मार्च : व्हॉट्सअॅप (WhatsApp) सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅपला सर्वच जण प्रोफाईल पिक्चर (DP) ठेवतात. तुमच्या व्हॉट्सअॅपचा DP कोण-कोण पाहतं हे सहजपण जाणून घेता येऊ शकतं. काय आहे ट्रिक? तुमचा व्हॉट्सअॅप डीपी कोण-कोण पाहतं, हे जाणून घेण्यासाठी एक अॅप डाउनलोड करावं लागेल. सर्वात आधी गुगल प्ले स्टोरवर आपल्या अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये WhatsApp- Who Viewed Me किंवा Whats Tracker नावाचं अॅप डाउनलोड करावं लागेल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी त्याच्यासोबत 1mobile market हेदेखील डाउनलोड करावं लागेल. या अॅपशिवाय WhatsApp- Who Viewed Me डाउनलोड होणार नाही.
(वाचा - WhatsApp वर डिलिट झालेले मेसेज कसे वाचाल; हा आहे पर्याय )
WhatsApp- Who Viewed Me फोनमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर काही वेळ वाट पाहावी लागेल. काही वेळात तुमच्या अॅपवर त्या लोकांची लिस्ट येईल, ज्यात कोणी तुमचा प्रोफाईल फोटो पाहिला, कोण तुमचा प्रोफाईल फोटो चेक करतं हे दिसेल.
(वाचा - Logout करायचं विसरलात? असं जाणून घ्या किती सिस्टममध्ये आजही ओपन आहे तुमचं Gmail )
अॅप अंतर्गत समोर आलेल्या यादीमध्ये केवळ त्या लोकांबाबत समजेल, ज्यांनी मागील 24 तासांत तुमचा प्रोफाईल फोटो पाहिला आहे. तुमच्यासमोर कॉन्टॅक्ट कॅटेगरी येईल, ज्यात चोरुन प्रोफाईल फोटो पाहाणाऱ्यांची लिस्ट असेल.
(वाचा - हरवलेला फोन कसा शोधाल? डिलीटही करू शकता चोरी झालेल्या फोनचा डेटा )
परंतु हे अॅप तुमच्या फोनसाठी किती सेफ आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आपल्या जबाबदारीवर हे अॅप डाउनलोड करुन ही ट्रिक वापरता येऊ शकते. युजर्सनी आपल्या रिस्कवर अशा अॅप्सचा वापर करावा.