जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / WhatsApp वर डिलिट झालेले मेसेज कसे वाचाल; हा आहे पर्याय

WhatsApp वर डिलिट झालेले मेसेज कसे वाचाल; हा आहे पर्याय

WhatsApp वर डिलिट झालेले मेसेज कसे वाचाल; हा आहे पर्याय

डिलिट झालेले मेसेज पुन्हा वाचण्यासाठी युजर्सला थर्ड-पार्टी अ‍ॅप डाउनलोड करावं लागेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : WhatsApp ने काही वर्षांपूर्वी भारतीय युजर्ससाठी डिलीट फॉर एव्हरीवन (Delete for everyone) हे फीचर लाँच केलं होतं. कोणत्याही युजरला, कोणत्याही चॅटमध्ये पाठवलेला मेसेज या फीचरमुळे डिलीट करता येऊ शकतो. मेसेज डिलिट करण्यासाठी वेळमर्यादाही देण्यात आली होती. एकदा डिलिट केलेला मेसेज पुन्हा वाचण्यासाठी किंवा समोरच्याने डिलिट केल्यानंतर तो परत आणण्यासाठी कोणताही अधिकृत पर्याय नाही. परंतु दुसरी एक पद्धत आहे. ही दुसरी पद्धत iOS/iPhone युजर्ससाठी नाही. अँड्रॉईड फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरणारे युजर्स या सोप्या ट्रिकचा, व्हॉट्सअ‍ॅपवर डिलिट करण्यात आलेले मेसेज वाचण्यासाठी वापर करू शकतात. परंतु ही अधिकृत, ऑफिशियल पद्धत नाही. डिलिट झालेले मेसेज पुन्हा वाचण्यासाठी युजर्सला थर्ड-पार्टी अ‍ॅप डाउनलोड करावं लागेल.

(वाचा -  Jio चा जबरदस्त धमाका; 1999 रुपयांत जिओफोन आणि 2 वर्षांपर्यंत सर्वकाही मोफत )

असे वाचा डिलिट केलेले मेसेज - - गुगल प्ले स्टोरवर WhatsRemoved+ नावाचं थर्ड पार्टी अ‍ॅप डाउनलोड करावं लागेल. - WhatsRemoved+ अ‍ॅपची साईज 4.90MB आहे. अ‍ॅप डाउनलोड झाल्यानंतर ते ओपन करून टर्म्स आणि कंडिशन्स अ‍ॅक्सेप्ट करावं लागेल. - त्यानंतर WhatsApp सिलेक्ट करून Continue वर क्लिक करावं लागेल. - त्यानंतर WhatsRemoved+ कडून फाईल सेव्ह करावी की नाही हा पर्याय विचारला जाईल. इथे हवा तो पर्याय सिलेक्ट करावा लागेल. त्यानंतर अ‍ॅप एका अशा पेजवर घेऊन जाईल, जिथे सर्व डिलिट केलेले व्हॉट्सअ‍ॅप मेसेज दिसतील.

(वाचा -  …तर 15 मेपासून WhatsApp वर मेसेज पाठवता येणार नाही; जाणून घ्या नव्या पॉलिसीबाबत )

- स्क्रिनवर वरच्या भागात डिटेक्टेड ऑप्शनच्या बाजूला दिसणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपवर क्लिक करावं लागेल. - जसा हा ऑप्शन इनेबल होईल, तसे सर्व डिलिट केलेले व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वाचता येतील. दरम्यान, हा डिलिट केलेले मेसेज वाचण्याचा अधिकृत पर्याय नाही. हे थर्ड पार्टी App आहे. या थर्ड पार्टी अ‍ॅपमध्ये अनेक जाहिराती येतात. असे अ‍ॅप्स युजर्सचा डेटाही कलेक्ट करू शकतात. त्यामुळे युजर्सनी आपल्या रिस्कवर अशा अ‍ॅप्सचा वापर करावा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात