Home /News /technology /

तुमच्या फायद्याची बातमी, Online Transaction करताना या गोष्टींकडे लक्ष द्या; अन्यथा...

तुमच्या फायद्याची बातमी, Online Transaction करताना या गोष्टींकडे लक्ष द्या; अन्यथा...

सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गांनी लोकांनी फसवणूक करत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. तसंच काही असे Apps आहेत, जे आर्थिक व्यवहार धोक्यात टाकू शकतात. त्यामुळे असे App मोबाईलमध्ये ठेवणं, धोक्याचं ठरू शकतं.

  नवी दिल्ली, 7 जून : मागील काही वर्षात ऑनलाईन ट्रान्झेक्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक लोक दररोजच्या व्यवहारांसाठी Google Pay, Paytm, PhonePe सारख्या मोबाईल वॉलेटचा वापर अधिक करू लागले आहेत. एकीकडे यामुळे आपल्या सुविधेत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गांनी लोकांनी फसवणूक करत असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्याशिवाय काही असे Apps आहेत, जे आर्थिक व्यवहार धोक्यात टाकू शकतात. त्यामुळे असे App मोबाईलमध्ये ठेवणं, धोक्याचं ठरू शकतं. मोबाईलमध्ये हे App असल्यास लगेच करा डिलीट - रिसर्च रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये Cake VPN, Music Player, tooltipnatorlibrary Pacific VPN, eVPN, BeatPlayer, BeatPlayer, QR/Barcode Scanner MAX, eVPN असे अ‍ॅप इन्स्टॉल असतील, तर यामुळे नुकसान होण्याचा धोका आहे. त्यामुळे हे अ‍ॅप लवकर स्मार्टफोनमधून डिलीट करणंच फायद्याचं आहे. हॅकर्स या अ‍ॅप्सद्वारे तुमच्या बँक डिटेल्सची चोरी करू शकतात. अशी होते फसवणूक - हे सर्व मॅलिशियस अँड्रॉईड अ‍ॅप्स आहेत. हे युजर्सच्या स्मार्टफोनमध्ये AlienBot Banker आणि MRAT इन्स्टॉल करतात. AlienBot एक मालवेअर आहे, जो फायनेंशियल अ‍ॅप्समध्ये हॅकिंग करू शकतो. यामुळे बँकिंग डिटेल्सची चोरी होते. हे इतके स्मार्ट आहेत, की Google ला देखील चकमा देतात. एवढंच नाही, तर हे टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन कोडलाही हॅक करण्यास सक्षम आहेत.

  (वाचा - तुमचं Facebook, Twitter आणि Instagram कधीच होणार नाही हॅक; असं ठेवा सुरक्षित)

  ही बाब लक्षात ठेवा - स्मार्टफोनमधून फायनेंशियल ट्रान्झेक्शन करत असाल, तर नेहमी अधिकृत अ‍ॅप्सचा वापर करा. अ‍ॅप कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या लिंकद्वारेच डाउनलोड करा. स्मार्टफोन आणि अ‍ॅप्स वेळोवेळी अपडेट करा. फायनेंशियल अ‍ॅप्स लॉक ठेवा. कोणतंही थर्ड पार्टी अ‍ॅप डाउनलोड करू नका.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Online fraud, Online payments, Tech news

  पुढील बातम्या