मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आता घरबसल्या मिळवा Aadhaar द्वारे तुमचं लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स

आता घरबसल्या मिळवा Aadhaar द्वारे तुमचं लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स

आता लर्निंग लायसन्ससाठी लोक घरबसल्या केवळ आधार कार्डच्या डिटेल्सद्वारे अप्लाय करू शकतात. यासाठी टेस्टदेखील ऑनलाईनच घेतली जाईल.

आता लर्निंग लायसन्ससाठी लोक घरबसल्या केवळ आधार कार्डच्या डिटेल्सद्वारे अप्लाय करू शकतात. यासाठी टेस्टदेखील ऑनलाईनच घेतली जाईल.

आता लर्निंग लायसन्ससाठी लोक घरबसल्या केवळ आधार कार्डच्या डिटेल्सद्वारे अप्लाय करू शकतात. यासाठी टेस्टदेखील ऑनलाईनच घेतली जाईल.

  • Published by:  Karishma

मुंबई, 9 जून: राज्यात आता लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणं आणखीच सोपं झालं आहे. मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील 50 रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिस अर्थात RTO साठी दोन महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. पहिल्या आदेशानुसार, आता लर्निंग लायसन्ससाठी लोक घरबसल्या केवळ आधार कार्डच्या डिटेल्सद्वारे अप्लाय करू शकतात. यासाठी टेस्टदेखील ऑनलाईनच घेतली जाईल. आधारद्वारे त्या व्यक्तीची ओळख केली जाईल आणि घरबसल्याच लर्निंग लायसन्स मिळेल.

दुसऱ्या आदेशानुसार, डिलर्सला आता नॉन-ट्रान्सपोर्ट व्हिकल रजिस्ट्रेशनसाठी RTO मध्ये येण्याची गरज नाही. हेदेखील आधार ऑथेंटिकेशनद्वारे आता शक्य होणार आहे.

महाराष्ट्रातील ट्रान्सपोर्ट कमिश्नर अविनाश धनखडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या दोन दिवसांत स्वत: या योजनांची सुरुवात करू शकतात. या सुविधा सुरू झाल्यास, आरटीओमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल. यामुळे भ्रष्टाचार आणि एजेंट्सद्वारे लायसन्स देण्याचं कामही बंद होईल. लोकांचा वेळ आणि पैसा दोन्ही गोष्टी वाचतील. लायसन्स रिन्यू करणं, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट यासारख्या एकूण 18 गोष्टींसाठी आता आधार ऑथेंटिकेशनद्वारे काम होईल. यावर्षी मार्च महिन्यापासूनच अनेक सुविधांसाठी याचा वापर केला जात आहे.

महाराष्ट्रात दरवर्षी 20 लाख लर्निंग लायसन्स दिले जातात -

महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट दरवर्षी 20 लाखहून अधिक लर्निंग लायसन्स जारी करतं. इतकंच बाईक, नॉन-ट्रान्सपोर्ट व्हिकलचं रजिस्ट्रेशनही दरवर्षी होतं. नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटरने (NIC) वाहन 4.0 आणि सारथि 4.0 सिस्टम तयार केलं आहे, ज्याचा रजिस्ट्रेशन आणि लर्निंग लायसन्स जारी करण्यासाठी वापर केला जात आहे. आता आधार कार्ड नंबर आणि एका ऑनलाईन टेस्टद्वारे लर्निंग लायसन्स मिळेल.

(वाचा - लॉकडाउनमध्ये Car बंद असताना असा ठेवा मेंटेनन्स,Ford कंपनीच्या महत्त्वाच्या टिप्स)

कशी होईल टेस्ट -

या टेस्टमध्ये रोड सेफ्टीबाबत काही व्हिडीओ दाखवले जातील. त्यानंतर टेस्ट द्वावी लागेल. या टेस्टमध्ये 60 टक्के गुण मिळवणं अनिवार्य असून त्यानंतरच लायसन्स दिलं जाईल.

(वाचा - ...तर टोल प्लाझावर Toll भरू नका; मोदी सरकारचा वाहनधारकांना मोठा दिलासा)

नव्या गाइडलाइन्स -

रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने (Ministry of Road Transport & Highways) ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी आणि त्याच्या रिन्यूअलसाठी नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. या नव्या नियमानुसार, Learner’s license ची प्रक्रिया ऑनलाईन होईल. अ‍ॅप्लिकेशनपासून ते लायसन्सच्या प्रिटिंगपर्यंत संपूर्ण प्रोसेस ऑनलाईन होईल. त्याशिवाय इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट आणि डॉक्युमेंट्सचा वापर मेडिकल सर्टिफिकेट, लर्नर लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स सरेंडर आणि त्याच्या रिन्यूअलसाठी केला जाईल.

RC रिन्यूअल -

नव्या गाडीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सोपी व्हावी असा या नव्या गाइडलाइन्सचा उद्देश आहे. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट रिन्यूअल आता 60 दिवस अ‍ॅडव्हान्समध्ये केलं जाऊ शकतं. त्याशिवाय तात्पुरत्या रजिस्ट्रेशनचा कालावधीही आता 1 महिन्यावरुन 6 महिने करण्यात आला आहे. यासह सरकारने Learner’s License साठीच्या प्रक्रियेतही काही बदल केले आहेत. त्यानुसार ड्रायव्हिंग टेस्टसाठी RTO जाण्याची गरज लागणार नाही. हे काम व्हिडीओद्वारे घरबसल्या ऑनलाईन केलं जाऊ शकतं. कोरोना काळात हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

मार्च महिन्यात रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने कोरोना संकट काळात ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, फिटनेस सर्टिफिकेट, परमिट यासारख्या मोटर व्हिकल डॉक्युमेंट्सची वैधता 30 जून 2021 पर्यत वाढवली आहे. ज्या कागदपत्रांची वैधता 1 फेब्रुवारी 2021 रोजी संपली आहे, ते 30 जून 2021 पर्यंत वैध मानले जातील.

First published:

Tags: Tech news, Technology