नवी दिल्ली, 30 मे: नवीन फोन घेताना अनेक जण आपला आधीचा स्मार्टफोन एखाद्याला विकतात किंवा दुसऱ्याला असाच वापरण्यासाठी देतात. फोन विकताना किंवा दुसऱ्याला देताना (Smartphone Resale) तो Format किंवा Reset केला जातो. परंतु हीच सर्वात मोठी चूक ठरू शकते. आजकाल अनेक लोक आपल्या फोनमध्ये सोशल मीडिया अकाउंट्सचे पासवर्ड, ऑनलाईन ट्रान्झेक्शन पासवर्ड, फोटोज, व्हिडीओ सेव्ह करुन ठेवतात, जे फोन फॉर्मेट किंवा रिसेट केल्यानंतरही रिकव्हर करता येतात. त्यामुळे स्वत:चा फोन दुसऱ्याला देताना Format किंवा Reset करणं धोक्याचं ठरू शकतं. हॅकर्ससाठी तर ही सर्वात सोपी गोष्ट आहे. अशात हॅकर्स तुमच्या डेटाचा चुकीचा वापर करू शकतात. त्यामुळे अशा काही टिप्स आहेत, ज्यात तुम्ही तुमचा डेटा सुरक्षित ठेऊ शकता.
बॅकअपवेळी ही चूक करू नका -
ही सर्वात कॉमन स्टेप आहे. जवळपास सर्वच स्मार्टफोन युजर्स याचा वापर करतात. याद्वारे फोटो, व्हिडीओ आणि इतर गोष्टी दुसऱ्या डिव्हाईस किंवा इतर ठिकाणी सेव्ह करू शकता, त्यानंतर ते सहजपणे रिकव्हरही करता येतात. हे सर्वच जण करतात.
परंतु अनेक जण बॅकअप डेटा फोनमधून मॅन्युअली डिलीट (Manually Delete) करणं विसरतात. याचाच फायदा हॅकर्स किंवा इतरांकडून घेतला जातो आणि डेटाचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे बॅकअप घेतल्यानंतर डेटा डिलीट करणं गरजेचं आहे.
फोन नंबर्सचा बॅकअप कसा घ्याल?
अनेक जण फोटो, व्हिडीओचा तर बॅकअप घेतात, पण फोन नंबर्सचा बॅकअप घेणं विसरतात. कॉन्टॅक्टचा बॅकअप घेण्यासाठी दोन पद्धती आहेत. पहिली गुगल सिनच्या मदतीने (Google Syn Contact) आणि दुसरी vCard च्या मदतीने बॅकअप घेता येतो.
गुगल सिनसाठी फोन सेटिंगमध्ये जावं लागेल. त्यानंतर अकाउंट्स>गूगल>बॅकअप करावं लागेल. दुसऱ्या प्रकारे बॅकअप घेण्यासाठी फोनबुकमध्ये जावं लागेल, त्यानंतर कॉन्टॅक्ट सिलेक्ट करुन ते PDF फॉर्ममध्ये दुसऱ्या नंबर किंवा ईमेलवर पाठवावे लागतील. त्यानंतर सर्व नंबर बॅकअप होतील.
डेटा परमनेंटली डिलीट कसा कराल?
ज्यावेळी कधी तुम्ही स्मार्टफोनमधून फोटो, व्हिडीओ, डॉक्युमेंट्स, म्युझिक डिलीट करता, त्यावेळी ते परमनेंटली डिलीट होत नाहीत. केवळ तुम्हाला ते दिसत नाही. अशात कोणीही रिकव्हर सॉफ्टवेअरच्या मदतीने तुमचा डेटा पुन्हा डाउनलोड करू शकतं. परंतु तुम्ही ओवरराईड (override) फीचर्सच्या मदतीने यापासून वाचू शकता. यासाठी प्ले स्टोरवरुन Sherid App डाउनलोड करावं लागेल. हे अॅप ओपन केल्यानंतर अनेक अल्गोरिथम दिसतील. तुम्ही यापैकी कोणताही अल्गोरिथम सिलेक्ट करुन आपल्या फोनचा डेटा डिलीट करू शकता. त्यानंतर तुमचा डेटा डिलीट होईल आणि त्याच्या जागी डम्प फाईल येतील.
Gmail अकाउंट फोनमधून कसं हटवाल?
यासाठी फोन सेटिंगमध्ये जावं लागेल. त्यात Accounts पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर अनेक विंडो समोर ओपन होतील, ज्यात Google ऑप्शन दिसेल. गुगलवर क्लिक केल्यानंतर तुमचं Gmail डिलीट करा. हे केल्यानंतर फोन रिसेट करा. या सर्व प्रक्रियेनंतर तुम्ही तुमचा फोन कोणालाही देऊ शकता किंवा रिसेल करू शकता. कोणीही तुमचा डेटा अशाप्रकारे डिलीट केल्यानंतर रिकव्हर करू शकणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Android, Smartphone, Tech news