Home /News /technology /

Coronavirus: फेक Oximeter App पासून सावधान; खासगी, बायोमेट्रिक डिटेल्स चोरी होण्याचा धोका

Coronavirus: फेक Oximeter App पासून सावधान; खासगी, बायोमेट्रिक डिटेल्स चोरी होण्याचा धोका

ऑक्सिमीटर मोबाईल अ‍ॅप्लिकेशन फिंगर प्रिंटसह अन्य डेटाही चोरी करत आहेत. त्यामुळे लोकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे.

  नवी दिल्ली, 9 जून : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान (Coronavirus second wave) देशात मेडिकल ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला. अशात रुग्णांमध्ये ऑक्सिजन लेव्हल तपासण्यासाठी, ऑक्सिमीटर (Oximeter) खरेदी करण्याची मोठी रीघ होती. याचदरम्यान अनेक मोबाईल अ‍ॅप असे आले, ज्यांनी रुग्ण किंवा सामान्य व्यक्तीच्या शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण अर्थात सॅच्युरेशन लेव्हल सांगण्याचा दावा केला. परंतु जाणकारांच्या म्हणण्यानुसार, मोबाईल अ‍ॅप्लिकेशनमध्ये असं कोणतंही तंत्र नाही, ज्याने शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाणं समजेल. या अ‍ॅप्लिकेशनच्या उपयोगाने रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो. डॉ. रवि मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्सिजन कमतरतेचा फायदा घेत अनेक ऑक्सिमीटर बाजारात असेही आले, जे सरकारी नियम आणि मानकांनुसार नाहीत. अशा ऑक्सिमीटरमुळे रुग्णाला योग्य ऑक्सिजन लेव्हल (Oxygen level) समजत नाही. त्यामुळे ऑक्सिमीटरची खरेदी करताना ते तपासून घेणंचं फायद्याचं ठरेल. रवि मेहता यांनी ऑक्सिजन सॅच्युरेशन सांगणाऱ्या एका मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचा प्रयोगही दाखवला. ज्यात ऑक्सिजन लेव्हल तर दाखवली गेली, परंतु त्या अ‍ॅप्लिकेशनने ते अचूक असल्याचा दावा केला नाही. सध्या बाजारात असे अनेक अ‍ॅप आहेत, जे ऑक्सिजन सॅच्युरेशन दाखवण्याचा दावा करतात. मोबाईल अ‍ॅप्लिकेशन सरकारी नियमांनुसार नसल्याचं डॉ. रवि मेहता यांनी सांगितलं. रुग्णालयात ऑक्सिजन, हार्टबिटसह विविध स्तरांवर तपासणीसाठी मोठ्या मशिनी असतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान चीनमधून आयात झालेल्या ऑक्सिमीटरमुळे अनेकांना समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे नागरिकांनी योग्य ठिकाणाहून आणि तपासूनच ऑक्सिमीटर खरेदी करावं असंही ते म्हणाले.

  (वाचा - Alert! शरीरातील Oxygen लेवल तपासण्यासाठी अ‍ॅप वापरताय, तर आधी हे वाचा)

  अ‍ॅप्समुळे डेटा चोरीच्या तक्रारी - सायबर एक्सपर्ट पवन दुग्गल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्सिमीटर मोबाईल अ‍ॅप्लिकेशन फिंगर प्रिंटसह अन्य डेटाही चोरी करत आहेत. त्यामुळे लोकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. हे अ‍ॅप शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण सांगण्यास पात्र नाहीत. मॉर्फेन लॅबोरेटरीजनुसार, ऑक्सिमीटर इंफ्रारेड तंत्राद्वारे लोकांना ऑक्सिजन सॅच्युरेशन सांगतं. परंतु मोबाईल अ‍ॅप्लिकेशन फोटोप्लेथेसमोग्राफी तंत्राने ऑक्सिजन सॅच्युरेशन सांगण्याचा दावा करतात. DCGI आणि CDSCO कडून यांना मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे मोबाईल अ‍ॅप्लिकेशनवर विश्वास ठेवणं धोक्याचं ठरु शकतं. या अ‍ॅपसह डेटा चोरीच्या तक्रारीही समोर आल्या आहेत.

  (वाचा - तुम्ही Oximeter चा चुकीचा वापर तर करत नाही ना? केंद्राने सांगितली योग्य पद्धत)

  मागील वर्षी 2020 मध्ये सरकारने ऑक्सिमीटर मोबाईल अ‍ॅपबाबत अलर्ट जारी केला होता. या दरम्यान अनेकांनी मोबाईल ऑक्सिमीटर अ‍ॅप डाउनलोड केले होते. केंद्र सरकारच्या सायबर यूनिटनेही ट्विट करत लोकांना अलर्ट केलं होतं. अ‍ॅडव्हायजरीमध्ये, युजर्सनी अज्ञात URL वरुन ऑक्सिमीटर अ‍ॅप डाउनलोड न करण्याचं सांगितलं होतं. हे अ‍ॅप भलेही ऑक्सिजनचं प्रमाण सांगण्याचा दावा करतात, परंतु ते नकली असू शकतं. हे अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर युजर्सची खासगी माहिती, बायोमेट्रिक डिटेल्सही चोरी होऊ शकतात.

  (वाचा - Oxygen Level तपासण्यासाठी स्मार्टफोनमध्ये Oximeter App चा वापर धोकादायक; पोलिसांकडून Alert जारी)

  बायोमेट्रिक डिटेल्स, ज्यात आपल्या अंगठा किंवा इतर बोटांचे ठसे-प्रिंट असतात, ही आपल्या सर्वात गुप्त माहितीपैकी एक आहे. ही माहिती चोरी झाल्यास किंवा चुकीच्या हातात गेल्यास याचा दुरुपयोग केवळ बँकेतून पैसे काढण्यासाठीच नाही, तर आपल्या ओळखीचा चुकीचा वापरही केला जाऊ शकतो.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Apps, Oxygen supply, Tech news

  पुढील बातम्या