नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : WhatsApp युजर्ससाठी चांगली बातमी आहे. लवकरच WhatsApp पेमेंट फीचरचा (WhatsApp Payment Feature) वापर करणाऱ्या युजर्सला कॅशबॅक देण्यास सुरुवात करणार आहे, WhatsApp ने सर्वात आधी भारत आणि ब्राजिलमध्ये पेमेंट्स फीचर रोलआउट केलं होतं. आता भारतात युजर्सला रिवॉर्ड देण्यासाठी या फीचरचं टेस्टिंग सुरू आहे.
Wabetainfo ने सर्वात आधी नव्या कॅशबॅक फीचरची माहिती दिली. हे फीचर सध्या टेस्ट केलं जात आहे. Wabetainfo फीचर ट्रॅकरने एक स्क्रिनशॉट पोस्ट केला होता, ज्यात चॅट विंडोमध्ये एक नवं कॅशबॅक बॅनर दाखवण्यात आलं होतं. पुढील पेमेंटवर कॅशबॅक मिळवा, ऑफरचा फायदा घेण्यासाठी इथे टॅप करा, अशा आशयाचा मेसेज बॅनरवर लिहिलेला होता. पण नेमका हा कॅशबॅक कधी मिळेल, कोणत्या युजर्सला मिळेल याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.
Wabetainfo रिपोर्टनुसार, कॅशबॅक सर्वांना मिळेल, की केवळ असे युजर्स ज्यांनी WhatsApp वर कधीही पेमेंट केलं नाही अशा पहिल्यांदा पेमेंटचा वापर करणाऱ्या युजर्सला मिळेल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. WhatsApp Payment वर 10 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. ही रक्कम फीचर रोलआउट झाल्यानंतर बदलली जाऊ शकते. लवकरच ही कॅशबॅकची सुविधा उपलब्ध होईल अशी माहिती आहे.
📝 WhatsApp beta for Android 2.21.20.3: what’s new? WhatsApp is working on the possibility to get cashback after using WhatsApp UPI Payments in India, for a future update!https://t.co/eH6uhe7PAo
— WABetaInfo (@WABetaInfo) September 22, 2021
सध्या या फीचरवर काम सुरू आहे. ज्यावेळी भारतात हे फीचर रोलआउट होईल, त्यावेळी सर्व युजर्स WhatsApp Payment वर कॅशबॅकचा लाभ घेऊ शकतात. मात्र WhatsApp ने याबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.