Home /News /technology /

WhatsApp वर परत मिळतील Delete झालेले Chats, पाहा सोपी ट्रिक

WhatsApp वर परत मिळतील Delete झालेले Chats, पाहा सोपी ट्रिक

काही ट्रिकने डिलीट झालेले चॅट परत मिळवता येऊ शकतात. WhatsApp Chat कसे रिकव्हर कराल?

  नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : WhatsApp जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. अनेकदा डिलीट होऊ न देणारे WhatsApp Chat चुकून डिलीट होतात. हे पुन्हा तसे मिळवता येत नाहीत. पण काही ट्रिकने डिलीट झालेले चॅट परत मिळवता येऊ शकतात. WhatsApp Chat कसे रिकव्हर कराल? युजर्सचे सर्व चॅट रियल टाइमवर दिसतात. तुमच्या फोनमध्ये नेहमी तुमच्या चॅटचा बॅकअप असवा, त्यानंतरच डिलीट झालेले चॅट पुन्हा मिळवता येऊ शकतात. हे फीचर केवळ अँड्रॉईड युजर्ससाठीच उपलब्ध आहे. - सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये फाइल मॅनेजर ओपन करा. - फाइल मॅनेजरमध्ये WhatsApp Folder ओपन करा आणि डेटाबेसवर क्लिक करा. या फोल्डरमध्ये सर्व व्हॉट्सअ‍ॅप बॅकअप फाइल आहेत. - msgstore.db.crypt12 फाइलचं नाव एडिट करा. - त्याला msgstore_backup.db.crypt12 बॅकअप नाव द्या. ही प्रक्रिया नवी फाइल बदलण्यापासून वाचण्यासाठी आहे. - आता तुमच्या लेटेस्ट बॅकअप फाइलचं नाव बदला msgstore.db.crypt12 - आता Google Drive मध्ये जा आणि WhatsApp Backup डिलीट करा. - त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप अनइन्स्टॉल करुन पुन्हा इन्स्टॉल करा. - पुन्हा इन्स्टॉल करताना रिस्टोरचा पर्याय येईल. जसं रिस्टोरवर क्लिक कराल, इथे msgstore.db.crypt12 सिलेक्ट केल्यानंतर रिस्टोर सिलेक्ट करा. आता डिलीट झालेले चॅट पुन्हा तपासता येतील.

  WhatsApp चं भन्नाट फीचर, आता तुमच्या फोटोचंही बनवता येणार Sticker

  WhatsApp Chat Recover - व्हॉट्सअ‍ॅप चॅट दुसऱ्या पद्धतीनेही रिकव्हर करू शकता. ही पद्धत अँड्रॉईड आणि iOS युजर्स वापरू शकतात. व्हॉट्सअ‍ॅप अनइन्स्टॉल केल्यानंतर पुन्हा इन्स्टॉल करा. ज्यावेळी पुन्हा इन्स्टॉल कराल, त्यावेळी इथे iCloud किंवा Google Drive वरुन बॅकअप रिस्टोर करण्याची परवानगी मागितली जाईल. आता बॅकअप रिस्टोर करुन डिलीट झालेले चॅट तपासू शकता.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Tech news, WhatsApp chats, WhatsApp user

  पुढील बातम्या