• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • क्या बात है! आता WhatsApp वर ग्रुप कॉल करणं होणार अजूनच भन्नाट; लवकरच येणार 'हे' नवीन फिचर

क्या बात है! आता WhatsApp वर ग्रुप कॉल करणं होणार अजूनच भन्नाट; लवकरच येणार 'हे' नवीन फिचर

नवीन फिचर्समुळे (Whatsapp new Features) ग्रुप कॉल करणं सोपं होणार आहे.

 • Share this:
  व्हॉट्सअॅप (WhatsApp) आपल्या अॅपसाठी ग्रुप कॉल (Group Call) शॉर्टकटसह अनेक नवीन फिचर्सवर काम करत आहे. ग्रुप कॉल (How to do group call on whatsapp) करणाऱ्यांसाठी व्हॉट्सअॅपने आनंदाची बातमी दिली आहे. नवीन फिचर्समुळे (Whatsapp new Features) ग्रुप कॉल करणं सोपं होणार आहे. व्हॉट्सअॅपने अलीकडेच 2.21.19.15 बीटा अपडेट बाजारात आणलं आहे. या नवीन फिचरमुळे वापरकर्त्यांना ग्रुप कार्डद्वारे ग्रुप कॉल करणं खूप सोपं होईल. या नवीन अपडेटमध्ये व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल शॉर्टकट उपलब्ध असतील, असं WABetaInfo च्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. जेव्हा वापरकर्ते कॉन्टॅक्ट कार्ड पाहतील तेव्हा त्यांना शॉर्टकट दिसेल. ज्या बीटा युजर्सना आता त्यांच्या फोनमध्ये हे फिचर दिसत नाहीए त्यांना ते दिसण्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल. या व्यतिरिक्त, व्हॉट्सअॅपच्या नव्या आयओएस (iOS) बीटा आवृत्तीमध्ये नवीन ‘व्हिडिओ कंट्रोल’ हे फिचर आलं आहे. हे फिचर आधीपासूनच अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. हे वाचा - Fraud Alert: तुम्हालाही येतोय या नंबरहून फोन? बँकेकडून सावधानतेचा इशारा व्हॉट्सअॅप (WhatsApp) ने बीटा अँड्रॉइड 2.21.3.13 साठी 'म्यूट व्हिडिओ' हे नवीन फिचर सादर केलं आहे. हे फीचर वापरून आयओएस (iOS) वापरकर्ते लवकरच व्हिडिओ पाठवण्यापूर्वी म्यूट करू शकतील. हे फिचर अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिल्यानंतर सुमारे सात महिन्यांनी आयओएस बीटा वापरकर्त्यांसाठी आणलं गेलं आहे. अहवालानुसार, व्हॉट्सअॅप आयओएस वापरकर्त्यांसाठी नवीन डिझाइनसह फीचर आणत आहे. हे फीचर सध्या विकसित होत आहे आणि व्हॉट्सअॅपने अद्याप या फीचरबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. Wabetanifo च्या मते, अखेर आता व्हॉट्सअॅप म्यूट व्हिडिओ फिचर आयओएस (iOS) वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होईल. 'व्हॉट्सअॅपने 7 महिन्यांपूर्वी अँड्रॉईड 2.21.3.13 साठी व्हॉट्सअॅप बीटावरील व्हिडीओ म्यूट करण्यासाठी नवीन फीचर सादर केलं होतं. वापरकर्ते व्हिडिओला GIF मध्ये रूपांतरित करण्यासाठी सुधारित टॉगलमध्ये म्यूट व्हिडिओ हा पर्याय पाहू शकतात. त्यावर क्लिक केलं की व्हिडिओचा आवाज बंद म्हणजे तो म्यूट होईल. दरम्यान, व्हॉट्सअॅपने नुकतंच फोटोंचं स्टिकर्समध्ये रूपांतर करणारं फिचर आणलं आहे. हे फिचर अॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये आहे. व्हॉट्सअॅप आयओएस आणि अँड्रॉइड दोन्ही वापरकर्त्यांसाठी हे फिचर विकसित करत आहे. या व्यतिरिक्त, व्हॉट्सअॅप नॉन-बीटा परीक्षकांना मल्टी-डिव्हाइस फीचर्स वापरायला मिळण्याची सुविधादेखील देत आहे. हे वाचा - तुमचा फोन Hack झालाय? फोनमध्ये Malware आहे की नाही असं ओळखा जेव्हा हे फीचर उपलब्ध होईल, तेव्हा कॅप्शन बारच्या पुढे एक नवीन स्टिकर चिन्ह असेल. जेव्हा तुम्ही ते निवडाल तेव्हा फोटो स्टिकर म्हणून पाठवला जाईल. व्हॉट्सअॅप फीचर ट्रॅकरने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये, स्टिकरमध्ये फोटो तयार करण्याचा पर्याय डायलॉग बॉक्समध्ये दिसू शकतो. अशा पद्धतीने नवनवीन फीचर्स वापरून युजर्स आपलं काम अधिकाधिक सोपं करत असतात.
  First published: