नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : व्हॉट्सअॅपच्या iOS आणि Android युजर्सला Multi-Device फीचरमध्ये एक बदल पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक व्हॉट्सअॅप युजर्सचे Security Code बदलले आहेत. असं का होत आहे? WhatsApp ने दिलेल्या माहितीनुसार Multi-Device Capacity फीचरच्या Roll-out च्या दरम्यान (WhatsApp users will get notification even after changing the security code) हा Security Code बदलत असावा. या फीचरमध्ये युजरला स्मार्टफोन कनेक्ट केल्याशिवाय चार Device लिंक करता येणार आहे.
WabetaInfo जारी केलेल्या एका ट्विटमध्ये व्हॉट्सअॅप सिक्युरिटी (what is security code in whatsapp) कोडमध्ये बदल करण्याची योजना आखत असल्याची माहिती देण्यात आली आहे. जेव्हा युजर्स नव्या स्मार्टफोनद्वारे WhatsApp अकाउंट रजिस्टर करतो किंवा लॉगआउट करतो त्यावेळी युजर्सला कोणतेही नोटिफिकेशन देण्यात येणार नसल्याची माहिती आहे.
WhatsApp ची यावर भूमिका काय?
WhatsApp कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार युजरचे सर्व चॅट हे Encrypted असतात. या दरम्यान युजरला एक Security code जारी होत असतो, ज्याचा उपयोग Verify करण्यासाठी होत असतो. युजरचे चॅट आणि कॉलिंग End-to-end encrypted असतात. 60 अंकी क्यूआर कोड हा युजरसाठी यूनिक असतो, ज्याद्वारे डेटा आणि चॅटला (security code Feature is change in WhatsApp) गोपनीय ठेवण्यास मदत होत असते.
आता युजरने WhatsApp रिइन्स्टॉल केलं किंवा स्मार्टफोन बदलला तर Security code ही बदलू शकतो. ही सुविधा End-to-end encrypted चॅटमधील Contact दरम्यानच असणार आहे. यासाठी WhatsApp सेटिंग ओपन करून अकाउंट च्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर Security च्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Security information ला enabled करता येऊ शकतं.
दरम्यान आता Multi-device feature द्वारे युजरला लॉगइन करण्यासाठी स्मार्टफोनची गरज भासणार नाही. याआधी त्यासाठी युजर्सला Active internet connection सह स्मार्टफोन सोबत ठेवावा लागत होता. परंतु आता याची गरज भासणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.