नवी दिल्ली, 22 जानेवारी : व्हॉट्सअॅपने (WhatsApp) मागील काही दिवसांपूर्वी कंपनी एका नव्या फीचरवर काम करत असल्याचं म्हटलं होतं. या फीचरद्वारे युजर्स थेट अॅपद्वारे कंपनीशी कॉन्टॅक्ट करून सपोर्ट घेऊ शकतील. यासाठी आता कंपनी इन-अॅप सपोर्ट (in-app support) नावाने एक फीचर जारी करत आहे.
या फीचरद्वारे युजर्स कंपनीकडून WhatsApp द्वारे कॉन्टॅक्ट करुन मदत घेऊ शकतात. म्हणजेच ज्याप्रमाणे तुम्ही मित्रांशी किंवा कुटुंबियांशी व्हॉट्सअॅपवर बोलता, चॅट करता त्याचप्रमाणे तुम्ही कंपनीशीही चॅट करू शकाल.
रिपोर्टमध्ये WABetaInfo ने कंपनीचं नवं इन-अॅप सपोर्ट फीचर युजर्सला व्हॉट्सअॅप बग रिपोर्ट मॅनेज करण्यासाठी मदत करेल असं म्हटलं होतं. त्याचवेळी WABetaInfo ने सांगितलं, की कंपनीचं हे इन-अॅप सपोर्ट फीचर किंवा सपोर्ट चॅट थ्रेड वेरिफाइड आणि एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड चॅट्स असणार आहे.
युजरची समस्या सोडवल्यानंतर हे चॅट क्लोज केलं जाईल. आता WhatsApp हे फीचर सर्व अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) बीटा टेस्टरसाठी रोलआउट करत आहे. हे फीचर WhatsApp च्या Android बीटा वर्जन 2.22.3.5 आणि iOS च्या बीटा वर्जन 22.2.72 मध्ये अॅक्सेस केलं जाऊ शकतं.
WABetaInfo नुसार हे फीचर लवकरच स्टेबल वर्जनसाठीही रिलीज केलं जाईल. हे फीचर वापरणं अतिशय सोपं आहे. त्यात काही समस्या असल्यास WhatsApp मध्ये सेटिंग टॅबमध्ये (WhatsApp Setting) जावं लागेल. त्यानंतर Help Section मध्ये जावं लागेल. त्यानंतर Contact us ऑप्शनवर टॅप करा. इथे तुमच्या समस्या मेसेजमध्ये लिहून WhatsApp ला पाठवू शकता. त्यानंतर WhatsApp तुमच्या समस्येवर चॅट करेल आणि समस्या सोडवल्यानंतर चॅट विंडो बंद होईल.
दरम्यान, WhatsApp वर कोणीही कोणतीही माहिती मागितल्यास लगेच देऊ नका. फसवणूक करणारे फ्रॉडस्टर्स जवळच्या व्यक्तीने नावाने, मित्र-कुटुंबियांच्या नावाने मेसेज करू शकतात. एखाद्याने वेरिफिकेशन कोड, बँकिंग डिटेल्स, ओटीपी, पासवर्ड मागितल्यास शेअर करू नका. तसंच संबंधित व्यक्तीला कॉल करुन सत्यता पडताळणी करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news, WhatsApp chats, Whatsapp New Feature, WhatsApp user