नवी दिल्ली, 21 जानेवारी : ऑनलाइन फ्रॉडच्या (Online Fraud) प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. व्हॉट्सअॅपवरही (WhatsApp) अनेकांची मोठी फसवणूक (WhatsApp Fraud) झाली आहे. अशाच एका प्रकरणाबाबत पोलिसांकडून युजर्सला अलर्ट करण्यात आलं आहे. WhatsApp वरुन क्लोनिंग (WhatsApp Cloning) करण्याचा प्रयत्न केला जात असून याच्या मदतीने सिम स्वॅपिंग (SIM Swap) होऊ शकतं.
कोलकाता पोलिसांनी ट्विटरवरुन युजर्सला सावध केलं आहे. पोलिसांनी WhatsApp वर आलेल्या कोणत्याही मेसेज किंवा लिंकवर क्लिक न करण्याचा सावध इशारा दिला आहे. त्यासह लोकांना WhatsApp च्या सर्व सिक्योरिटी फीचर्सचा (WhatsApp Security Features) ही वापर करण्याचं आवाहन केलं आहे.
पोलिसांनी सांगितलं, की WhatsApp वर असे मेसेज येऊ शकतात, ज्यात लिंकवर क्लिक करण्यास, तसंच वेरिफिकेशन कोड शेअर करण्यास सांगितला असेल. तसंच हे कोड आणि लिंक पाठवणारे लोकही तुमच्या जवळचे असू शकतात. तुमच्या जवळच्या कोणाचाही लिंकवर क्लिक करण्यास आणि कोड शेअर करण्याचा मेसेज आला, तरी कोड शेअर करू नका. या लिंक्सवर क्लिक केल्यानंतर फ्रॉड करणाऱ्या लोकांना तुमच्या WhatsApp च्या अॅक्सेस मिळेल.
तुमच्या मित्रांकडून, कुटुंबियांकडून असे मेसेज आल्यास, त्यांना थेट कॉल करुन एकदा क्रॉस चेक करा, की मेसेज पाठवणारा व्यक्ती नेमका तेच आहेत की नाही. काही लोकांना फेक WhatsApp आणि KYC अपडेटशी संबंधित मेसेज मिळाले होते. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. हे मेसेज सामान्य मेसेजप्रमाणेही असू शकतात. केवळ Hello मेसेजवरुनही फ्रॉड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. तसंच फेसबुकद्वारे होणाऱ्या फ्रॉडबाबतही (Facebook Fraud) पोलिसांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.
WhatsApp वर कोणीही कोणतीही माहिती मागितल्यास लगेच देऊ नका. फसवणूक करणारे फ्रॉडस्टर्स जवळच्या व्यक्तीने नावाने, मित्र-कुटुंबियांच्या नावाने मेसेज करू शकतात. एखाद्याने वेरिफिकेशन कोड, बँकिंग डिटेल्स, ओटीपी, पासवर्ड मागितल्यास शेअर करू नका. तसंच संबंधित व्यक्तीला कॉल करुन सत्यता पडताळणी करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news, Whatsapp alert, WhatsApp chats, WhatsApp user