नवी दिल्ली, 29 जुलै : व्हॉट्सअॅप (WhatsApp) सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. सध्याच्या काळात जवळपास सर्वच कामांसाठी व्हॉट्सअॅपचा वापर केला जातो. आता हे केवळ संवादासाठीच माध्यम राहिलेलं नसून घरातील महत्त्वाच्या कामांपासून ते ऑफिसच्या कामासह अनेक आवश्यक कामं या अॅपच्या माध्यमातून केली जातात. व्हॉट्सअॅपही युजर्सचा वाढता वापर पाहता आपल्या अॅपमध्ये अनेक अपडेट करत आहेत. आता नुकतंच व्हॉट्सअॅपने आपल्या अॅपमध्ये एक नवं अपडेट जोडलं आहे.
व्हॉट्सअॅपचं हे नवं फीचर अशा युजर्ससाठी अतिशय फायदेशीर आहे, जे आपलं पर्सनल चॅट लपवू इच्छितात. WhatsApp ने आर्काइव्ड चॅट फीचर (WhatsApp Archived Chats) रोलआउट केलं आहे.
कसं काम करतं हे फीचर -
WhatsApp ने मंगळवारी आपल्या आर्काइव्ड चॅट सेटिंग्स (WhatsApp Archived Chats) फीचरमध्ये बदल केले आहेत. म्हणजे हे फीचर इनेबल करुन नवे मेसेज हाईड करता येऊ शकतात. नव्या फीचरमुळे, आर्काइव्ड चॅटमध्ये एखादा नवा मेसेज आला, तरीदेखील ते चॅट आर्काइव राहील. याआधी आर्काइव चॅटमध्ये एखादा नवा मेसेज आल्यास, तो अनआर्काइव होत होता. परंतु आता तुमच्या एखाद्या आर्काइव चॅटमध्ये नवा मेसेज आल्यासही तो आता दिसणार नाही.
कंपनीने हे फीचर Android आणि iOS दोन्ही युजर्ससाठी रोलआउट केलं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, नवा मेसेज आल्यावर आर्काइव चॅट मेन चॅट लिस्टमध्ये येत होतं, जे की आर्काइव फोल्डरमध्येच असणं गरजेचं असल्याची मागणी अनेक युजर्सकडून होत होती. त्यानंतर आता या फीचरमध्ये बदल करण्यात आले आहेत.
कसं कराल चॅट Archive?
सर्वात आधी चॅट टॅबवर जावं लागेल. अशा चॅटवर टॅप करुन ठेवा, जे तुम्हाला लपवायचं आहे किंवा अर्काइव करायचं आहे. त्यानंतर होल्ड केल्यानंतर तुम्हाला आर्काइव आयकॉन मिळेल. iPhone युजर्स चॅट डावीकडे स्लाईड करुन आर्काइव ऑप्शन दिसेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news, WhatsApp chats, WhatsApp features, Whatsapp messages, WhatsApp user