Home /News /technology /

Gmail इनबॉक्समधले नको असलेले असंख्य ईमेल्स करा एका फटक्यात डिलिट

Gmail इनबॉक्समधले नको असलेले असंख्य ईमेल्स करा एका फटक्यात डिलिट

फक्त ही सुविधा वेब-बेस्ड जीमेलसाठी उपयुक्त आहे. याचा वापर करून अगदी कमी वेळात तुम्ही जीमेल इनबॉक्स रिकामा करू शकता.

    मुंबई, 28 जुलै : आपल्या जीमेलच्या (Gmail) इनबॉक्समध्ये (Inbox) दररोज नवनवीन ईमेल्स येत असतात. काही आपल्या कामाच्या असतात तर काही निरुपयोगी असतात. मात्र आपण वेळोवेळी इनबॉक्स क्लीअर (Inbox Clear) केला नाही तर, ईमेल्सच्या साठ्यात भर पडत जाते आणि एक दिवस ईमेल बाउन्स होत असल्याचं लक्षात येतं. किंवा जीमेलकडून आपल्या अकाउंटची स्टोअरेज(Account Storage) क्षमता संपली असून नवीन स्पेस विकत घ्या असा संदेश येतो. त्यावेळी आपल्या लक्षात येतं की जीमेलचे स्टोअरेज (Gmail Storage) रिकामं करणं आवश्यक आहे. हे काम करायला घेतल्यावर ते किती कठीण आहे हे लक्षात येतं. कारण शेकडो, हजारो ईमेल्समधून आवश्यक, महत्त्वाच्या ईमेल्स ठेवणं आणि उरलेल्या एकेक करत डिलिट करणं अतिशय त्रासदायक ठरतं. या त्रासातून सुटका करण्यासाठी एक युक्ती आहे. फक्त ही सुविधा वेब-बेस्ड जीमेलसाठी उपयुक्त आहे. याचा वापर करून अगदी कमी वेळात तुम्ही जीमेल इनबॉक्स रिकामा करू शकता. टीव्ही9 हिंदी डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. इनबॉक्समधील अनेक ईमेल्स एकावेळी डिलिट करण्यासाठी : यामध्ये सर्वांत आधी तुम्हाला हवे असलेले आणि जे ईमेल्स तुम्हाला इनबॉक्समध्ये(Inbox) ठेवायचे आहेत,त्याचा विचार केला पाहिजे. याकरता अशा सर्व ईमेल्सना अनरीड(Unread) केलं पाहिजे किंवा त्यांना दुसऱ्या एखाद्या फोल्डरमध्ये सेव्ह केलं पाहिजे. त्यानंतर इनबॉक्स उघडून सर्च बारमध्ये ‘is:read’ ही कमांड टाईप करा आणि नंतर एंटर दाबा. जीमेल तुम्ही आधी वाचलेल्या सर्व ईमेल्स वेगळ्या करेल. आता चेक बॉक्स(Check Box) पर्यायाद्वारे सर्व ईमेल्स सिलेक्ट करा. जेव्हा आपण असे 50 किंवा 100 ईमेल्स निवडतो तेव्हा ग्रे कलरमध्ये ते दिसतात आणि त्या सोबत ‘Select all conversations that match this search’ हा पर्याय दिसेल. आता एकदा तुम्ही ठेवू इच्छित असलेले ईमेल्स यात आलेले नाहीत याची खात्री करून घ्या. नंतर टास्कबारवरील ट्रॅश आयकॉनवर(Trash Icon) क्लिक करा. त्यानंतर जीमेलकडून बल्कमध्ये ईमेल्स डिलीट करण्याची खात्री करण्याकरता मेसेज येईल. त्यावरील ओके ऑप्शनवर क्लिक केल्यास सर्व निवडलेल्या ईमेल्स ट्रॅशमध्ये जातील. तुम्हाला किती ईमेल डिलीट करायच्या आहेत किंवा कोणत्या ठेवायच्या आहेत, यावर यासाठी लागणारा वेळ अवलंबून आहे. वेळ गेला तरी तुम्हाला क्लीन जीमेल इनबॉक्स मिळेल.
    First published:

    Tags: Gmail

    पुढील बातम्या