Home /News /technology /

Google वर या 5 गोष्टी सर्वाधिक सर्च करतात पुरुष; रिसर्चमधून हैराण करणारा खुलासा

Google वर या 5 गोष्टी सर्वाधिक सर्च करतात पुरुष; रिसर्चमधून हैराण करणारा खुलासा

गुगलवर पुरुषांनी ज्या 5 गोष्टी सर्वाधिक सर्च केल्या आहेत, त्यापासून त्यांनी स्वत:चा बचाव करण्याचा सल्लाच देण्यात आला आहे.

  नवी दिल्ली, 28 जुलै: गुगल (Google) अनेकांच्या आयुष्यात महत्त्वाचा भाग ठरतो आहे. आरोग्यापासून ते दररोजच्या कोणत्याही समस्येबाबत गुगलवर सर्रास सर्च (Google Search) केलं जातं. कोरोनामुळे अनेक जण अधिकतर वेळ मोबाईल, इंटरनेटवर घालवत असल्याने विविध गोष्टी सर्च करण्याच्या प्रमाणात अधिकच वाढ झाली आहे. गुगलच्या या सर्चबाबतच frommars.com कडून एक रिसर्च करण्यात आलं, या रिसर्चमध्ये पुरुष गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात, याबाबत खुलासा झाला आहे. पुरुषांसंबंधी अशा 5 गोष्टी समोर आल्या आहेत, ज्या त्यांनी लपून-छपून सर्च केल्या आहेत. गुगलवर पुरुषांनी ज्या 5 गोष्टी सर्वाधिक सर्च केल्या आहेत, त्यापासून त्यांनी स्वत:चा बचाव करण्याचा सल्लाच देण्यात आला आहे. -वर्षभरात गुगलवर 68,600 लोकांनी कमजोर इरेक्शन (Weak Erection) नपुसंकतेची निशाणी आहे का? किंवा हे नपुसंक तर नाही ना? असं सर्च केलं आहे. - 68,400 पुरुषांनी शेव्हिंग केल्याने दाढीचे केस अधिक प्रमाणात वाढतात का? असं सर्च केलं. - पुरुषांना ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो का? असं वर्षभरात 61,200 पुरुषांनी सर्च केलं आहे. - टोपी घातल्याने किंवा केस वाढवल्याने पुरुषांचे केस गळतात, याबाबत सरासरी 52,100 पुरुषांनी वर्षभरात सर्च केलं आहे. - प्रोटीन वर्कआउटनंतर लगेच घ्यावं की नाही, किंवा कोणतं प्रोटीन खावं याबाबत जवळपास 51000 पुरुषांनी सर्च केलं आहे.

  Google Search Trends: फ्री पॉर्नपेक्षा या गोष्टीत भारतीयांना अधिक रस; अहवालात हैराण करणारी बाब समोर

  या प्रश्नांची नेमकी उत्तर काय? पुरुषांमध्ये कमजोर इरेक्शनमुळे नपुसंकता येणं हा समज चुकीचा आहे. अशाप्रकारची समस्या जेष्ठांमध्ये सामान्य आहे. तसंच मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब सारख्या कारणामुळेही ही समस्या येऊ शकते. अशात पुरुषांनी लाइफस्टाइलमध्ये काही बदल केल्यास, या समस्येपासून दूर राहता येऊ शकतं. शेव्हिंगमुळे दाढीचे केस आणखी वाढत असण्याबाबत कोणतेही पुरावे नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. अधिक प्रमाणात औषधांच्या सेवनानेही असं होऊ शकत असल्याचा अंदाज आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषांमध्ये महिलांप्रमाणे नाही, परंतु त्यांनाही ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. हा पुरुषांमध्ये होणाऱ्या इतर कॅन्सरच्या तुलनेत अतिशय वेगळा असतो. 60 वर्षांनंतर पुरुषांना ही समस्या होऊ शकते.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Google, Tech news

  पुढील बातम्या