मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आता WhatsApp होणार अधिक सुरक्षित, विना 6 डिजीट PIN लॉगइन करू शकणार नाही युजर्स

आता WhatsApp होणार अधिक सुरक्षित, विना 6 डिजीट PIN लॉगइन करू शकणार नाही युजर्स

रिपोर्टनुसार, डेस्कटॉपवर व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा (WhatsApp Chat) अ‍ॅक्सेस अधिक चांगला आणि सुरक्षित करण्यासाठी हे फीचर फायदेशीर ठरणार आहे.

रिपोर्टनुसार, डेस्कटॉपवर व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा (WhatsApp Chat) अ‍ॅक्सेस अधिक चांगला आणि सुरक्षित करण्यासाठी हे फीचर फायदेशीर ठरणार आहे.

रिपोर्टनुसार, डेस्कटॉपवर व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा (WhatsApp Chat) अ‍ॅक्सेस अधिक चांगला आणि सुरक्षित करण्यासाठी हे फीचर फायदेशीर ठरणार आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 25 जानेवारी : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये (WhatsApp) कंपनी अनेक नवनवीन अपडेट देत असते. आता WhatsApp अकाउंट आणखी सुरक्षित करण्यासाठी यात आणखी एक फीचर (WhatsApp New Feature) जोडण्यात येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आता टू-स्टेप वेरिफिकेशन (Two Step Verification) सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. हे फीचर केवळ डेस्कटॉप युजर्ससाठी (WhatsApp Desktop) असेल. तसंच हे फीचर वापरायचं की नाही यासाठीचीही सुविधा युजर्सला मिळेल.

सध्या ज्यावेळी तुम्ही नव्या स्मार्टफोनद्वारे WhatsApp वर लॉगइन (WhatsApp Login) करता, त्यावेळी अ‍ॅप एक 6 डिजीट कोड मागतो. हा कोड तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर पाठवला जातो. तसंच डेस्कटॉप लॉगइनसाठी तुम्हाला केवळ व्हॉट्सअ‍ॅप वेबवर (WhatsApp Web) एक क्यूआर कोड स्कॅन (QR Code) करावा लागतो. त्यानंतर तुमचं अकाउंट लॉगइन केलं जातं. यासाठी तुम्हाला कोणत्याही पीनची (PIN) गरज पडत नाही. परंतु आता व्हॉट्सअ‍ॅप वेबसाठी पीनची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. 6 डिजीट PIN ने लॉगइन करावं लागेल.

हे वाचा - खांबाला धडकून रक्ताच्या थारोळ्यात पडली महिला, कानातील Smart Device ने वाचवला जीव

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, डेस्कटॉपवर व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा (WhatsApp Chat) अ‍ॅक्सेस अधिक चांगला आणि सुरक्षित करण्यासाठी हे फीचर फायदेशीर ठरणार आहे. WABetaInfo ने सांगितलं, की व्हॉट्सअ‍ॅप प्रत्येक ठिकाणी टू-स्टेप वेरिफिकेशन (Two Step Verification) मॅनेज करणं अधिक सोपं करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे येणाऱ्या अपडेटमध्ये वेब/डेस्कटॉपवर ही फीचर सुरू करण्यासाठी काम सुरू आहे. PIN 6 डिजीटचा असेल. सध्या हे फीचर टेस्टिंग स्टेजमध्ये आहे. लवकरच हे फीचर रिलीज केलं जाईल.

हे वाचा - VIDEO: रिक्षा आहे की लक्झरी कार,ऑटोच्या भन्नाट मोडिफिकेशने Anand Mahindraही चकित

फोन हरवल्यास काय होईल?

मिळालेल्या रिपोर्टनुसार, वेब/डेस्कटॉप युजर्स टू-स्टेप वेरिफिकेशन इनेबल किंवा डिसेबल करू शकतील. हे अशावेळी अधिक गरजेचं ठरतं, ज्यावेळी तुमचा फोन हरवतो आणि तुमचा पीन तुमच्या लक्षात नसतो. तुम्ही एका रिसेट लिंकद्वारे पीन रिस्टोर करू शकता.

First published:

Tags: Tech news, Whatsapp alert, Whatsapp New Feature, WhatsApp user