मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /आता WhatsApp वर स्टेटस ठेवताना होणार असे बदल, पाहा नव्या अपडेटमध्ये काय असणार

आता WhatsApp वर स्टेटस ठेवताना होणार असे बदल, पाहा नव्या अपडेटमध्ये काय असणार

युजरच्या प्रोफाईलवर व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस जोडणं या अपडेटवर WhatsApp काम करत आहे.

युजरच्या प्रोफाईलवर व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस जोडणं या अपडेटवर WhatsApp काम करत आहे.

युजरच्या प्रोफाईलवर व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस जोडणं या अपडेटवर WhatsApp काम करत आहे.

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : तुम्हीही व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस (WhatsApp Stauts) ठेवत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. व्हॉट्सअ‍ॅप लवकरच एक अपडेट रोलआउट करणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप सध्या अनेक अपडेट्सवर काम करत आहे. काही दिवसांत व्हॉट्सअ‍ॅपचं मल्टी-डिव्हाईस फीचर (Multi Devise Feature) लाँच होणार आहे. या फीचरनंतर युजर एकाच वेळी चार डिव्हाईसमध्ये व्हॉट्सअ‍ॅप लिंक करू शकतील. तसंच कंपनी चांगल्या इमोजी सपोर्ट आणि व्हॉट्सअ‍ॅप वेबसाठी इमेज एडिटिंग टूल आणण्याच्या विचारात आहे. आता एका रिपोर्टनुसार, कंपनी आपल्या स्टेटस फीचरमध्ये मोठे बदल करण्यावर काम करत आहे.

WhatsApp ने 2017 मध्ये स्टेटस फीचर लाँच केलं होतं. हे फीचर Snapchat स्टोरीज फीचरचं एक क्लोन जिथे युजर 24 तासांसाठी फोटो आणि व्हिडीओ अपलोड करू शकत होते. आता WABetaInfo च्या एका नव्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपचं आगामी अपडेट स्टेटस फीचरमध्ये अपडेटसह येणार आहे.

Google Chrome चा वापर करता का? लगेच करा अपडेट, सरकारकडून अलर्ट जारी

तुमचा फोन हॅक होण्यापासून वाचवतील या स्मार्ट Tips, वाचा Security Tricks

रिपोर्टनुसार, युजरच्या प्रोफाईलवर व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस जोडणं या अपडेटवर WhatsApp काम करत आहे. WABetaInfo मध्ये शेअर केलेल्या स्क्रिनशॉटनुसार, आता नव्या अपडेटमध्ये एखाद्या प्रोफाईल फोटोवर टॅप केल्यानंतर युजर्सला ते प्रोफाईल फोटो पाहू इच्छितात की स्टेटस याबाबत विचारलं जाईल.

First published:
top videos

    Tags: Tech news, Whatsapp, WhatsApp features, WhatsApp user