नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : स्मार्टफोनचा (Smartphone) वापर केवळ फोटो, व्हिडीओसाठी केला जात नसून, आता अनेक सोशल मीडिया अकाउंट्स, बँक अकाउंट्सही फोनमध्ये सेव्ह असतात. टेक्नोलॉजीमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या असताना, दुसरीकडे सायबर क्राईम, ऑनलाईन फ्रॉडच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे हॅकिंगचे प्रकारही वाढले आहेत. सोशल मीडिया अकाउंट्स, मोबाईल फोन सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. अँटी व्हायरस कंपनी McAfee ने याबबात काही सूचना केल्या असून त्यानुसार तुमचा फोन अधिक सुरक्षित ठेवता येऊ शकतो.
McAfee च्या अधिकृत वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, स्मार्टफोनमध्ये फेस, फिंगर, पॅटर्न किंवा पिन लॉक ठेवणं गरजेचं आहे. ज्यावेळी फोन हरवतो किंवा चोरी होता अशावेळी हे लॉक फायदेशीर ठरतं. तसंच फोनचा पासवर्ड स्ट्राँग ठेवणंही गरजेचं आहे. तसंच टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (Two Factor Authentication) ऑन ठेवणं महत्त्वाचं ठरतं.
कधीही पब्लिक प्लॅटफॉर्मच्या वाय-फाय (Wi-Fi) नेटवर्कवर अवलंबून राहू नका. असे नेटवर्क सुरक्षित नसतात. त्यामुळे अशावेळी वीपीएनचा (VPN) वापर करणं फायद्याचं ठरतं. वीपीएन हॅकर्सपासून तुमचं कनेक्शन मास्क करतं. जर तुम्ही विमानतळ, कॅफे किंवा हॉटेलसारख्या ठिकाणी असाल, तर वीपीएन तुम्हाला प्रायव्हेटली कनेक्ट करतं.
Google Play Store किंवा Apple App Store वरुन कोणतंही अॅप डाउनलोड करताना, त्याचे रिव्ह्यू वाचणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे या दोन्ही अॅपवर मॅलिशिअस अॅप्स नसतात. परंतु सावध राहणं गरजेचं आहे. तसंच कोणतंही थर्ड पार्टी अॅप डाउनलोड करू नका. अॅप नेहमी अधिकृत प्लॅटफॉर्मवरुन डाउनलोड करा.
स्मार्टफोन वापरताना वेळोवेळी त्याचा डेटा बॅकअप (Data Backup) घेणं आवश्यक आहे. यामुळे नवीन फोन घेतल्यास किंवा फोन हरवल्यास सर्व डेटा मिळतो.
अनेकदा आपण अॅप डाउनलोड करतो, परंतु काही वेळानंतर त्याचा वापर केला जात नाही. पण हे अॅप अपडेट करणं, अपडेट ठेवणं गरजेचं असतं. जुने किंवा वापरात नसलेले, नको असलेले अॅप डिलीट करा. तसंच फोन सतत अपडेटेड ठेवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hacking, Smartphone, Tech news